पेडर रोडच्या पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू…

दक्षिण मुंबईतील डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड – केम्पस कॉर्नर फ्लाय ओव्हर) उड्डाणपुलावर तडा गेल्याचा संदेश वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पूल वाहतूक पोलिसांनी बुधवारी दुपारी तातडीने वाहनांसाठी बंद केला होता. परंतु संध्याकाळी या पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

( हेही वाचा : ‘BH’ या नंबर प्लेटची वाहने बघून आश्चर्यचकीत होऊ नका, कारण…)

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, वाहतूक पोलीस विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, महानगरपालिकेच्या पूल विभागाचे अभियंते, पूल संरचना लेखापरीक्षक यांनी या ठिकाणी भेट देऊन परीक्षण केले. या परीक्षण अंती आढळले की, या पुलावर कोणताही तडा गेलेला नसून सदर पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. त्यानंतर म्हणजे अर्ध्या तासाच्या आत हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here