ऑफिसला जायला उशीर झाल्यास किंवा अनेकदा घाईत गाडीत चालवताना वाहन चालकांकडून चुका होतात. दुचाकी चालवताना चुकीच्या दिशेने गाडी चावल्यास, हेल्मेट घातले नसेल, वाहनाची लाईट किंवा हॉर्न सदोष असला तरी तो वाहन चालकाचा दोष मानला जातो. अशावेळी ट्राफिक हवालदार गाडी अडवतात आणि नियमांनुसार योग्य कारवाई केली जाते. चलान भरावे लागू नये म्हणून अनेक जण विनंती करतात किंवा काहीजण पोलिसांशी हुज्जत घालतात, वाहन चालक ऐकत नसेल तर बऱ्याचवेळा वाहतूक पोलीस गाडीची चावी काढून घेतात.
( हेही वाचा : ७५ दिवसांच्या ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ या मोहिमेची सांगता)
परंतु तुम्हाला माहिती आहे का? गाडीची चावी काढणं हे नियमांच्या विरूद्ध आहे, तुमच्या गाडीची चावी काढून घेण्याचा, तुम्हाला अटक करण्याचा किंवा वाहन जप्त करण्याचा अधिकार हवालदाराला नसतो. ट्राफिक नियमांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया…
काय आहेत नियम जाणून घ्या?
- जर वाहन चालकाने कोणत्याही ट्राफिक नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. त्या दंडाची पावती ई-चलान मशिन किंवा पावती बुक मध्ये येणे आवश्यक आहे.
- ट्राफिक पोलिसांनी तुमची कागदपत्रे जप्त केल्यास त्याचीही पावती घेणे आवश्यक आहे.
- कोणतेही ट्राफिक पोलीस अधिकारी तुम्हाला न विचारता गाडीची चावी घेऊ शकत नाही. भारतीय मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये पोलीस कर्मचाऱ्याला वाहन तपासणीदरम्यान वाहनाची चावी काढण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. तुम्हाला वाहन परवाना दाखवायला सांगितले तर तो दाखवावा लागेल.
- जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर तुमचे वाहन टो करू शकत नाही.
- वाहन चालवताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्न, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मूळ प्रत असायला हवी. तसेच वाहन नोंदणी आणि इन्शुरन्सची फोटोकॉरी देखील चालते.
ही कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा…
- नोंदणी प्रमाणपत्र ( आरसी)
- प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी)
- विमा दस्तऐवज
- वाहन परवाना ( Driving licence)