मालगाडी अपघात, मुंबई-पुणे-नागपूर रेल्वे मार्गावर एका बाजूने वाहतूक सुरू

144

दिवाळी सुरू असताना अमरावती जवळ मालखेड टिमटाला दरम्यान रविवारी उशिरा टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगडीचे 20 डब्बे रूळावरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या डब्यांना बाजूला करण्याचे काम कालपासूनच सुरू होते. एका बाजूचे काम झाल्याने मुंबई पुणे नागपूर रेल्वे मार्गावर एका बाजूने वाहतूक सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – साकीनाक्यात दुकानांना आग, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न)

रविवारी मध्यरात्री मालखेड-टीमटाला स्थानकादरम्यान मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवासी वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. या अपघातानंतर रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावरील 6 गाड्या रद्द केल्या असून 27 गाड्यांचे मार्ग बदलले. ऐन दिवाळीच्या दिवशी मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसली. अनेक गाड्या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या होत्या. या दुर्घटनेमुळे नागपूर मुंबई मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीचे इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे हे रुळावर आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. नागपूर, मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली होती. रेल्वेच्या नागपूर डिव्हिडनमध्ये ही घटना घडली. घटना घडल्यानंतर घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी पोहोचले. यानंतर रेल्वे रूळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.