अनोळख्या व्यक्तींकडून कॉल करून त्रास देण्याच्या घटना अनेकदा घडत असतात. मग अशा अनोळख्या व्यक्तींचं नाव जाणून घेण्यासाठी truecaller किंवा त्यासारख्या अनेक अॅपचा आधार घेतला जातो. पण आता अशा अॅप शिवाय सुद्धा कॉल करणाऱ्याचे नाव समजावे यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय दूरसंचार विनिमायक प्राधिकरण(TRAI)ला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
(हेही वाचाः एसी लोकल वाढल्याचा सामान्य लोकलना फटका, सर्वसामांन्यांचा 40 मिनिटे होतो खोळंबा)
TRAI विकसित करणार तंत्रज्ञान
केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार आता TRAI कडून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात यासाठी हालचाली सुरू करण्यात येतील अशी माहिती TRAI चे अध्यक्ष पी.डी. वाघेला यांनी दिली आहे. इतर अॅपपेक्षा TRAI चे नवीन तंत्रज्ञान हे अधिक पारदर्शक आणि उत्तम असेल अशी माहिती वाघेला यांनी दिली आहे.
असे आहे वैशिष्ट्य
प्रत्येकाने मोबाईलचे जम कार्ड घेताना KYC केलेले नावच समोरच्याच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. इतर अॅपवर अशा पध्दतीचे तंत्रज्ञान नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान अधिक सोयीस्कर असणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणे ऐच्छिक असेल की सर्वांना त्याचा वापर करता येईल, याबाबत अजून कुठलाही निर्णय झाला नसल्याचेही वाघेला यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः पश्चिम रेल्वेचे प्रवासी ‘फर्स्ट क्लास’, हे आहे कारण)
Join Our WhatsApp Community