TRAI New Tariff: केबल, DTH ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवसापासून नवे नियम लागू

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने नवीन टॅरिफ ऑर्डर 2.0 मध्ये सुधारणा केली आहे. आता केबल आणि डीटीएच ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नव्या नियमानुसार, १९ रूपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एका प्लॅनमध्ये सामील होऊ शकणार आहेत. या नव्या नियमांबाबत TRAI चे सचिव, व्ही. रघुनंदन यांनी अधिसूचना जारी केली आहे.

काय आहे नवी अधिसूचना

नवीन अधिसूचनेनुसार, सर्व वितरक त्यांच्या पे चॅनेलच्या प्लॅनची किंमत निश्चित करताना प्लॅन असलेल्या सर्व पे चॅनेलच्या किंमतीवर जास्तीत जास्त ४५ टक्के सूट देऊ शकतात. सध्या केवळ ३३ टक्के सूट दिली जाऊ शकते. ट्रायच्या मते, पे चॅनलची किंमत वितरकाने दिलेल्या सवलतीवर अवलंबून असणार आहे.

(हेही वाचा – Railway Recruitment 2022: पश्चिम मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी! २५०० हून अधिक पदांकरता मागवले अर्ज)

ट्रायने काय म्हटले…

वितरक सर्व चॅनलचे नाव, भाषा, चॅनलची दरमहा किंमत आणि चॅनलेच्या प्लॅनची रचना आणि किमती मधील कोणत्याही बदलाचा अहवाल १६ डिसेंबर २०२२ पर्यंत देणार असल्याचे ट्रायने म्हटले आहे. ट्रायचे नवे नियम १ फेब्रुवारी २०२३ पासून लागू होणार आहे. ट्रायच्या मते, टेलिव्हिजन चॅनलचे सर्व वितरक हे निश्चित करतील की, १ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ग्राहकांना प्लॅन किंवा त्यांनी निवडलेल्या चॅनलनुसार सेवा प्रदान केल्या जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here