Railway Accident : गुजरातमध्ये रेल्वे घातपाताचा प्रयत्न उघडकीस

63
Railway Accident : गुजरातमध्ये रेल्वे घातपाताचा प्रयत्न उघडकीस
Railway Accident : गुजरातमध्ये रेल्वे घातपाताचा प्रयत्न उघडकीस

गुजरातच्या सुरतमधील किम रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री रेल्वे ट्रॅकशी छेडछाड (Gujarat Railway track tampering) करून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले. अज्ञात समाज कंटकांनी अप लाईनच्या रेल्वे रूळांहून फिश प्लेट आणि चाव्या काढून घेतल्या. तसेच या फिश प्लेट आणि चाव्या रुळांवर ठेवण्यात आले होते. रेल्वे रुळांना जोडणारे 71 कुलूपही काढण्यात आले होते. यासंदर्भात माहिती मिळताच अप स्टेशन अधीक्षकांनी कीमन सुभाष कुमार यांना अलर्ट केले.  (Railway Accident)

ट्रॅकची तपासणी केली असता रेल्वेला घातपात करण्याचा कट रचल्याचे आढळून आले. त्यानंतर हा मार्ग बंद करण्यात आला. मात्र, नवीन फिश प्लेट (Railway track fish plate) बसवल्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाली. ही घटना रामपूर तालुक्यापासून 43 किमी अंतरावर असलेल्या रुद्रपूर सिटी रेल्वे स्थानकाजवळ (Rudrapur City Railway Station) घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुद्रपूर शहर विभागाचे रेल्वे अभियंता राजेंद्र कुमार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात समाज कंटकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे रेल्वे कर्मचारी तसेच जीआरपी, आरपीएफ आणि स्थानिक पोलीस सतर्क झाले आहेत. एटीएस आणि एनआयएचे पथक तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष ऑपरेशन गट करणार असल्याचे सुरत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हितेश जोयसर (SP Hitesh Joysar) यांनी सांगितले. (Railway Accident)

(हेही वाचा – Atishi CM Oath Ceremony : आतिशी दिल्लीच्या ८व्या मुख्यमंत्री; एलजी यांनी ५ मंत्र्यांना शपथ दिली)

भारतातील दहशतवादी संघटनांचे पुढील मोठे लक्ष्य रेल्वेगाड्या आहेत. त्याच्या मदतीने ते सर्वात सहजपणे सर्वात मोठे नुकसान करू शकतात. पाकिस्तानी दहशतवादी फरहातुल्ला घौरीच्या व्हिडिओने याची पुष्टी केली आहे. तो भारतात त्याचे स्लीपर सेल सक्रिय करत आहे आणि त्यांना ट्रेन रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यास सांगत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.