Train Canceled : राजनांदगाव आणि कन्हान दरम्यान १४ डिसेंबरपर्यंत ४८ रेल्वेगाड्या रद्द; जाणून घ्या काय आहे कारण

नॉन इंटरलॉकिंगच्या या कामामुळे नागपूरकडे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

205
Train Canceled : राजनांदगाव आणि कन्हान दरम्यान १४ डिसेंबरपर्यंत ४८ रेल्वेगाड्या रद्द; जाणून घ्या काय आहे कारण
Train Canceled : राजनांदगाव आणि कन्हान दरम्यान १४ डिसेंबरपर्यंत ४८ रेल्वेगाड्या रद्द; जाणून घ्या काय आहे कारण

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत कन्हान ते राजनांदगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम करण्यात येत असल्याने २ ते १४ डिसेंबर दरम्यान तब्बल ४८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नॉन इंटरलॉकिंगच्या या कामामुळे नागपूरकडे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. तर काही गाड्यांचे वेळापत्रक सुद्धा बदलण्यात आले आहे. (Train canceled)

तर ४ गाड्यांचा प्रवास अर्धवट राहणार आहे. तर, तीन रेल्वेगाड्या उशिरा धावणार आहेत. यामुळे आधीच प्रवासाचे नियोजन करून असलेल्या हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होणार आहे. नागपूर नजिकच्या कन्हान तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. (Train canceled)

रद्द करण्यात आलेल्या काही प्रमुख गाड्या

४ ते १४ डिसेंबर: गाडी क्र. ०८७११ डोंगरगड-गोंदिया मेमू, ०८७१३ गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस मेमू, ०८७१६ इतवारी-गोंदिया, ०८७५६ इतवारी-रामटेक मेमू, ०८७५१ रामटेक-इतवारी मेमू, ०८७१३ रामटेक-इतवारी मेमू, रामटेक-इतवारी मेमू, ०८७५८ रामटेक-५८, रामटेक-५८ -इतवारी मेमू,

५ ते १४ डिसेंबर :गाडी क्र. ०८२८१ इतवारी-तिरोडी पॅसेंजर स्पेशल, ०८२८४ तिरोडी-तुमसर पॅसेंजर, ०८२६८ इतवारी-रायपूर पॅसेंजर.

६ ते १५ डिसेंबर : गाडी क्र. ०८२८२ तिरोडी-इतवारी पॅसेंजर.

४ ते १३ डिसेंबर : गाडी क्र. ०८२६७ रायपूर-इतवारी पॅसेंजर.

४ ते १२ डिसेंबर : गाडी क्र. १८१०९ टाटा नगर-इतवारी एक्स्प्रेस. (Train Canceled)

(हेही वाचा : December 2023 Financial Deadlines : आर्थिक नियोजनासाठी डिसेंबरमध्ये ‘या’ तारखांवर लक्ष ठेवा )

६ ते १४ डिसेंबर : गाडी क्र. १८११० इतवारी-टाटा नगर एक्स्प्रेस.

८ डिसेंबर : गाडी क्र. १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस.

१० डिसेंबर : गाडी क्र. १२८६९ मुंबई-हावडा एक्स्प्रेस.

४, ०५, ११ व १२ डिसेंबर : गाडी क्र. २०८४३ बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस.

७, ९,१४ व १६ डिसेंबर : गाडी क्र. २०८४४ भगत की कोठी- बिलासपूर एक्स्प्रेस. (Train Canceled)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.