दररोज कोट्यवधी लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विविध योजना सातत्याने राबवल्या जातात. बऱ्याचवेळा आपले तिकीट बुक केल्यावर आपला प्लॅन अगदी शेवटच्या क्षणी बदलतो. तारीख, वार, वेळेच्या बदलामुळे आपल्यावर तिकीट रद्द करण्याची वेळ येते. बऱ्याचदा लोक बुक केलेले तिकीट रद्द करून दुसरे तिकीट बुक करतात यावेळी तुमचे पैसेही कापले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तिकीट रद्द न करता तुम्हाला दुसरे तिकीट बुक करता येऊ शकते.
( हेही वाचा : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे खाजगीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन)
प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा
रेल्वेच्या नियमानुसार तुमच्या प्रवासाची वेळ किंवा प्लॅनमध्ये बदल झाला तर रेल्वे प्रवासाची तारीख आणि वेळही रेल्वेच्या उपलब्धतेनुसार आणि तुमच्या सुविधेनुसार बदलण्याची सोय उपलब्ध आहे. तिकीट रद्द न करता तुम्ही प्रवासाची तारीख बदलू शकता. यासाठी तुम्हाला गाडी सुटण्याच्या २४ तास आधी बोर्डिंग मॅनेजर किंवा संगणकीकृत आरक्षण केंद्राला भेट देऊन अर्ज करावा लागेल. प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहे.
प्रवास वाढवायचा असेल तर…
जर तुम्हाला तुमचा प्रवास आणखी वाढवायचा असेल, म्हणजेच ठरलेल्या जागेपेक्षा पुढील स्थानकापर्यंत प्रवास करायचा असेल तर, प्रवाशांना बुक केलेला प्रवास पूर्ण होण्याअगोदर तिकीट चेकिंग स्टाफशी (TC) संपर्क साधावा लागेल. गाडीत असलेले TC तुम्हाला वाढीव स्थानकाच्या प्रवासाचे तिकीट देतील.
Join Our WhatsApp Community