रेल्वे प्रवाशांना मिळणार उधारीवर तिकीट; Buy Now Pay Later ची सुविधा तुम्हाला माहिती आहे का?

83

भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतात विस्तारलेले आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रेल्वेने प्रवास केला आहे. लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवास हा सोयीस्कर ठरतो. रेल्वे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही उधारीवर रेल्वे प्रवास करू शकता. बऱ्याचदा अचानक गावी जावे लागते किंवा तुम्ही कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे रेल्वे तिकिटासाठी पैसे नसतील, तुमचा पगार झालेला नसेल तर आता तुम्हाला चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आता तुम्ही मोफत रेल्वे तिकीट बुक करू शकता. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी Buy Now Pay Later ची सुविधा तात्काळ तिकिटांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याद्वारे तुम्ही आधी तिकीट बुक करून नंतर तुमच्याकडे पैसे आल्यावर रेल्वेला पैसे देऊ शकता. या सुविधेअंतर्गत तुम्ही तिकीट बुक करण्यासोबत खरेदीही करू शकता.

New Project 2 18

( हेही वाचा : १ जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ३०० ऐवजी ४५० सुट्ट्या?)

बाय नाऊ पे लेटर सुविधा ( Buy Now Pay Later)

  • तुम्ही तुमची तिकिटे IRCTC वरून बुक करू शकता आणि नंतर पैस भरू शकता. ePayLater मार्फत ही सुविधा दिली जात आहे. तिकीट बुक केल्यावर रेल्वे प्रवासी १४ दिवसांच्या आत पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकतात. Buy Now Pay Later या सुविधेचा लाभ घेण्यसाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ज डिटेल्स भरावे लागतील यानंतर तुम्हाला OTP येईल. अल्पावधीत यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. देय तारखेनंतरच व्याज भरावे लागेल.
  • खरेदीच्या तारखेपासून पुढील १४ ते २० दिवसांमध्ये पेमेंट केले जाऊ शकते.
  • वेळेवर पेमेंट न केल्यास २४ टक्के व्याज भरावे लागेल
  • Buy Now Pay Later अंतर्गत प्रवासी तात्काळ तिकीट बुक करतात. म्हणून तत्काळ कोट्याअंतर्गत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

New Project 1 17

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.