धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! ‘या’ गाड्या विलंबाने, प्रवाशांची गैरसोय

वादळी हवामान आणि धुक्याचा रेल्वे सेवांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. गाड्यांना 1 तासांपासून ते 13 तासांपर्यंत विलंब होत आहे. परिणामी, रेल्वे प्रतिक्षालयात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नागपूरसह महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी होती. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

( हेही वाचा : येशूचे रक्त प्या, पूजा करा म्हणत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न; आळंदीत गुन्हा दाखल)

विलंबाने धावणाऱ्या गाड्यांची यादी

 • 12261 सीएसटीएम-हावडा, दुरंतो एक्स्प्रेस 14 तास 20 मिनिटे उशिरा
 • 12129 पुणे – हावडा आजाद हिंद एक्स्प्रेस 13.25 तास विलंब
 • 12126 हावडा सीएसटीएम प्रगती एक्स्प्रेस 9.23 तास
 • 12622 नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस 5.10 तास
 • 12130 हावडा-पुणे आजाद हिंद एक्स्प्रेस 6 तास
 • 06510 बंगळुरू 2.35 तास
 • 03253 पटना-सिकंदराबाद स्पेशल 2.20 तास
 • 2722 हजरत निजामुद्दीन-हैदराबाद 4 तास
 • 12649 यशवंतपूर हजरत निजामुद्दीन 1 तास
 • 12849 बिलासपूर-पुणे 2.30 तास
 • 12102 शालिमार लोमती ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस 4.10 तास
 • 12834 हावडा-अहमदाबाद 2.23 तास
 • 12833 अहमदाबाद-हावडा 5.44 तास

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here