Skill Development Training Center : महापालिकेच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

530
Skill Development Training Center : महापालिकेच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेने कांदिवली (पूर्व) येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. या केंद्रात मोफत उपलब्ध असलेले विविध व्यावसायिक कोर्सेस बाबत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटावे यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे शनिवारी २२ मार्च २०२५ आयोजन करण्यात आले. या मुख्याध्यापकांनी सध्या नववी आणि दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच आपल्या शाळेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांना या केंद्राबाबत माहिती द्यावी हा या जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.

या जनजागृती कार्यक्रमात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतील २४८ मुख्याध्यापक या कार्यक्रमास उपस्थित होते. (Skill Development Training Center)

(हेही वाचा – Prashant Koratkar चा पासपोर्ट पत्नीने पोलिसांकडे केला जमा)

कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी आणि उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करून रोजगारक्षम बनविण्याचे महत्त्व समजावून सांगितले. यानंतर उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि मुख्याध्यापकांनी कौशल्य केंद्राला भेट देऊन प्रगत प्रशिक्षण सुविधा पाहिल्या. कौशल्य विकास केंद्र उभारण्यासाठी झालेल्या सामूहिक प्रयत्नांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

कांदिवली कौशल्य केंद्र विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिक्षण आणि रोजगार यामधील अंतर भरून काढण्यासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. आयटीसी (आटीसी), ब्लू स्टार, कॉसमॉस आणि इतर अनेक नामांकित कंपन्यांनी येथे प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या केंद्राच्या माध्यमातून युवकांना उद्योगांसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येते, जे त्यांच्या रोजगार संधी वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, सर्व उपशिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विभाग निरीक्षक तसेच मनपा शाळांच्या मुख्याध्यापक उपस्थित होते. (Skill Development Training Center)

(हेही वाचा – Dharavi Redevelopment Project : माटुंगा रेल्वे स्थानकाशेजारील रेल्वेच्या जागेवर रचली जाणार धारावीच्या विकासाची विट)

संवादातून पोहोचवा माहिती

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले विद्यार्थी विविध माध्यमातून, मेळाव्यातून आपल्या शाळेतील शिक्षकांच्या संपर्कात असतात. शालेय अभ्यासक्रमानंतर ही मुले पुढे कुठला पर्याय निवडून यासाठी सतत शिक्षकांचा सल्ला घेतात. अशा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्राची माहिती द्यावी, असे आवाहन या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आले.

असे आहे कौशल्य विकास केंद्र

या केंद्रात युवक-युवतींना हॉटेल मॅनेजमेंट, विक्री आणि व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, एसी, फ्रीज दुरुस्ती प्रशिक्षण, व्हीफक्स-अनिमेशन प्रशिक्षण, शिवणकामाचे व्यावसायिक प्रशिक्षण, पंचतारांकित हॉटेल्स मधील नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आदी विविध प्रकारचे कोर्सेस या केंद्रात उपलब्ध आहेत. (Skill Development Training Center)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.