मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मस्जिद बंदर रोड स्थानकादरम्यानचा कर्नाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला मुंबई- पुणे दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात येणार असून, पुणे विभागातून जाणाऱ्या इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे.
( हेही वाचा : वीर सावरकरांचा अवमान : रणजित सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला… )
१९ आणि २१ नोव्हेंबरला पुणे विभागातील वाहतूक सुद्धा काही प्रमाणात विस्कळीत असणार आहे. पूल पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला रात्री करण्यात येणार आहे. परिणामी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विविध गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहे. या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत. २० नोव्हेंबरला मात्र पुणे विभागातील आणि पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.
मुंबई-पुणे दरम्यान रद्द केलेल्या गाड्या
१९ नोव्हेंबर २०२२ रोजी रद्द ट्रेन
12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
२० नोव्हेंबर २०२२ रोजी रद्द केलेल्या गाड्या
12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस
11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस
12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे
12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन
11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे
11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
२१ नोव्हेंबर २०२२ रोजी गाड्या रद्द
12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
Join Our WhatsApp Community