Online Payment : चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केलेत आता नो टेन्शन! असे मिळवा परत, काय आहे RBI चे नियम?

भारतात अलिकडे डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यास प्राधान्य दिले जाते. भारतात UPI पेमेंटचा वापर सर्रास केला जातो. विविध शॉपिंग अ‍ॅपसुद्धा कॅशलेस व्यवहारांवर आकर्षक ऑफर देतात. भारताच्या कानाकोपऱ्यात Google pay, PhonePay, UPI, Paytm द्वारे ऑनलाईन पेमेंट केले जाते. UPI द्वारे पेमेंट करणे अत्यंत सोयीचे आणि सोपे असते. परंतु ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईल नंबरचा एक अंक जरी चुकीचा असेल तर दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होऊ शकतात.

( हेही वाचा : म्हाडा इमारतींबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय! हजारो कुटुंबांना दिलासा)

एकदा दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण असे चुकून ट्रान्सफर झालेले पैसे तुम्ही परत मिळवू शकता. याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया…

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास काय कराल? 

गुगल पे, पेटीएम, फोन पे यांसारख्या अ‍ॅप्समधून UPI पेमेंट चुकीच्या खात्यात गेले किंवा हस्तांतरित झाले तर या संबंधित कंपन्या याला जबाबदार नाही. यासाठी तुम्हाला थेट बॅंकेशी संपर्क साधावा लागेल, याकरता तुमचे UPI पेमेंट बॅंकेशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले असतील तर तुम्हाला थेट बॅंकेच्या Customer Care ला यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. तसेच बहुतेक बॅंकांमध्ये थेट मेलची सुविधा सुद्धा ग्राहकांना देण्यात आलेली आहे. संबंधित बॅंकेत मेल केल्याने तुमच्या तक्रारीचे निवारण होऊ शकते. परंतु मेलद्वारे प्रकरण न सुटल्यास संबंधित बॅंकेच्या शाखेत जावे लागेल.

RBI चे नियम 

RBI त्या आदेशानुसार जर चुकीच्या खात्यात पैसै हस्तांतरित झाले तर तुम्हाला ७ ते १५ दिवसांच्या आत याबाबत तक्रार देणे आवश्यत आहे. चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास संबंधित बॅंक अधिकाऱ्याशी लवकरात लवकर संपर्क साधा. जर संबंधित व्यक्तीने तुम्ही ट्रान्सफर केलेले पैसे खर्च केले असतील तर नियमांनुसार बॅंक तुमचे पैसे तुम्हाला परत देईल, आणि पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीचा बॅलन्स निगेटिव्ह केला जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here