आरोग्य विभागाच्या सर्व बदल्या ऑनलाईन अॅपच्या माध्यामातून करण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या बदल्यांच्या संदर्भात कोणाचेही शिफारस पत्र चालणार नाही, बदल्यांमागील अर्थकारण थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
( हेही वाचा : ३ हजारात साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन; नवरात्रीसाठी एसटीची विशेष सुविधा )
डिजिटल पद्धतीने बदली होणार
आरोग्य विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी अद्ययावत डिजिटल अॅप तयार करणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना बदली करून घ्यायची आहे त्याने स्वत: या अॅपवर तीन पर्यायांची निवड करायची आहे यामधून मेरिटवर डिजिटल पद्धतीने बदली होणार आहे अशी माहिती डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
अ दर्जापासून ड दर्जापर्यंत सगळ्यांच्या बदल्या ऑनलाईन होणार
आरोग्य विभागातील अ दर्जापासून ड दर्जापर्यंत सगळ्यांच्या बदल्या ऑनलाईन होणार आहेत. यामध्ये एमबीबीएस डॉक्टर, उपजिल्हा रुग्णालयातील नर्सेस यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे ज्याला तीन वर्षे झाली आहेत त्यांना सध्याचे ठिकाण आहे ते सोडून आपल्या आयडीवरून तीन प्रेफरन्स ठिकाणे निवडायची आहेत. यानंतर बदली कुठे झाली हे त्याच्या आयडीवर दिसणार आहे. टीसीएस, इन्फोसिस, एमकेसीएल यांच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा राबवल्या जातात. याच माध्यमातून आता भरती प्रक्रिया राबवली जाईल असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community