कोरोना काळात थांबलेल्या राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश सोमवारी गृहमंत्रालयाने काढले आहे. यामध्ये काही आयपीएस अधिकारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
३८ आयपीएस अधिकारी यांचा समावेश
गृहमंत्रालयाने काढण्यात आलेल्या बदल्यांच्या आदेशात राज्यभरातील ३८ आयपीएस अधिकारी यांचा समावेश असून मुंबईतील काही अधिकारी यांना मुंबईत अंतर्गत बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक येथील संचालक अश्वती दोरजे यांची नागपूर शहर सह पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांची बदली विशेष पोलिस महानिरीक्षक सागरी सुरक्षा आणि गुप्तवार्ता विभागात करण्यात आली असून मुंबई पोलिस वाहतूक विभागाचे यशस्वी यादव यांना राज्य सायबर विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
(हेही वाचा : हिंदुत्वाशी गद्दारी करत मुख्यमंत्रीपद मिळवले! राणे पुन्हा गरजले)
अशा प्रमुख बदल्या!
सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवापदी तर सोलापूर पोलिस आयुक्त म्हणून ठाण्याचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (सुधारसेवा मुंबई) छेरिंग दोरजे यांची बदली नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या वाहतूक विभागात राजवर्धन यांची सह पोलिस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रित प्रतिनियुक्तीवर गेलेले राजेश मोरे यांना राज्यात परत आणण्यात आले असून त्यांच्यावर नाशिक पोलिस अकादमीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community