Transgender Dahihandi : दहीहंडी उत्सवात प्रथमच तृतीयपंथीय सहभागी होणार, पिंपरी-चिंचवडमध्ये चार संघ तयार

दहीहंडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल

160
Transgender Dahihandi : दहीहंडी उत्सवात प्रथमच तृतीयपंथीय सहभागी होणार, पिंपरी-चिंचवडमध्ये चार संघ तयार
Transgender Dahihandi : दहीहंडी उत्सवात प्रथमच तृतीयपंथीय सहभागी होणार, पिंपरी-चिंचवडमध्ये चार संघ तयार

देशभरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी हा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. राज्यभरातील गोविंदा पथके दहीहंडी साजरी करण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत. दहीहंडीचे थर रचण्याच्या सरावालाही सुरुवात झाली आहे. पुरुषांबरोबर महिलाही या उत्सावत सहभागी होतात, मात्र आता तृतीयपंथीयांचाही यामध्ये सहभाग असणार आहे.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तृतीयपंथीयांचा सहभाग असलेले 100 जणांचे तब्बल 4 संघ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात 25 तृतीयपंथीयांचा सहभाग आहे. येत्या 7 सप्टेंबरला पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांच्या या निर्णयाबाबत, “समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे.त्याप्रमाणे तृतीयपंथी यांना देखील आहे. आज तृतीयपंथी विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहे. ही चांगली बाब असून समाजाने त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे स्वीकारले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा प्रथमच तृतीयपंथी यांचे गोविंदा पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, पोलिसांची ४ पथके आरोपीच्या मागावर )

याबाबत तृतीयपंथी कादंबरी म्हणाल्या की,आजपर्यंत आम्हा तृतीयपंथीयांना वेगळ्या नजरेने पाहिले जात होते.पण मागील काही महिन्यात आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत आहे.हे पाहून आनंदाची गोष्ट वाटते तसेच आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने तृतीयपंथी यांना सुरक्षा रक्षक होण्याचा मान दिला.त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानते आणि आम्हाला मुख्य प्रवाहात येण्यास यातून मदत झाली आहे.अनेक सण उत्सवांमध्ये आम्ही सहभागी होत नव्हतो, पण आता गोविंदा पथकात सहभागी होण्यास मिळत आहे. हे पाहून खूप छान वाटते. असे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे म्हणाल्या की, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यापैकी एक तृतीयपंथी यांचा गोविंद पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याकरिता सर्वांना विशेष प्रशिक्षण दिले गेले असून या दहीहंडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडूनदेखील दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.