जानेवारी महिन्यात मुंबईत वाढत्या प्रदूषणावर दोन सरकारी संस्थांमध्ये वाद सुरु असताना मुंबई नव्हे तर नवी मुंबईतील नेरुळ येथे हवेचा दर्जा सर्वात जास्त प्रदूषित आढळला. २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान, नवी मुंबईतील नेरुळ येथील हवेचा दर्जा सलग ३०० प्रतिक्यूबीक मीटरपेक्षाही जास्त राहिला. नेरुळनजीकच्या उल्वे येथील नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम तसेच जेएनपीटीकडून सतत होणा-या अवजड वाहनांची वाहतूक या दोन प्रमुख कारणांमुळे आता नेरुळमध्ये वातावरण धोकादायक पातळीवर पोहोचल्याचा मुद्दा वातावरण फाऊंडेशनचे भगवान केशभट यांनी व्यक्त केला. नेरुळनजीकच्या सानपाडा आणि वाशी येथेही आता हवेची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.
उल्वे येथे नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम मोठ्या संख्येने सुरु आहे. नेरुळ आणि जेएनपीटी येथील अवजड वाहतूकीची येजा सतत सुरु असते. नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामामुळे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड हे दोन घातक धूलिकण वातावरणात मिसळतात. दोन्ही धूलिकण वातावरणातून सहज बाहेर जात नाहीत.
– भगवान केशभट, संस्थापक, वातावरण फाऊंडेशन
२६ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ६९ ठिकाणांतील हवेच्या प्रदूषणाची आकडेवारी पाहता मुंबई महानगर परिसरात नेरुळ येथे हवेचा दर्जा आता धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. तळोजा आणि महापे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा परिसरत आहे. केवळ तळोजा येथे हवेचा दर्जा २६ आणि २७ जानेवारीला अनुक्रमे २११ आणि २६८ प्रति क्युबीक मीटर नोंदवला गेला. संपूर्ण आठवड्यात नेरुळमध्ये सलग सहा दिवस तर वाशी आणि सानपाडा या दो्न्ही ठिकाणी हवेचा दर्जा तीन दिवस ३०० प्रति क्युबीकमीटरपेक्षा जा्स्त होता. हवेचा दर्जा ३०० प्रति क्युबीक मीटरपेक्षा जास्त असल्यास संबंधित विभागात जास्त काळ राहिल्यास सर्वांनाच श्वसनाचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. सलग सहा दिवस नेरुळमध्ये हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचल्याने नेरुळवासीयांच्या आरोग्यासाठी ही धोक्याची चिंता असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
(हेही वाचा काँग्रेसकडे ना व्हिजन ना बोलण्यात वजन; पंतप्रधानांचा घणाघात)
ठिकाण – हवेचा दर्जा
- कोप्रीगाव वाशी – २६ जानेवारीला हवेचा दर्जा ३१० तर २८ जानेवारीला ३०८ प्रति क्युबीकमीटरमध्ये नोंदवाल गेला.
- सानपाडा – २६ जानेवारी आणि २७ जानेवारी या दोन्ही दिवस हवेचा दर्जा अनुक्रमे ३१५ आणि ३०८ प्रति क्युबीकमीटरमध्ये नोंदवला गेला.
- नेरुळ – २७ ते १ फेब्रुवारीपर्यंत हवेचा दर्जा अनुक्रमे ३३१, ३४२, ३४३, ३६२, ३३१ आणि ३०० प्रति क्युबीकमीटरमध्येे नोंदवला गेला.