Road Safety : रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून आयुष्य सुरक्षित ठेवावे, परिवहन आयुक्तांचे आवाहन

नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाहने जबाबदारीपूर्वक चालवून आपले व इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

236
Road Safety : रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून आयुष्य सुरक्षित ठेवावे, परिवहन आयुक्तांचे आवाहन

रस्त्यांवरील अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखवण्यासाठी परिवहन विभागामार्फत ‘रस्ता सुरक्षा’ (Road Safety) मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी रस्ता सुरक्षा (Road Safety) नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाहने जबाबदारीपूर्वक चालवून आपले व इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भिमनवार (Vivek Bhimanwar) यांनी केले आहे. (Road Safety)

परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा (Road Safety) मोहिमेच्या माध्यमातून रस्ते वाहतूक व महामार्गांवरील सुरक्षितता तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्ता सुरक्षा (Road Safety) ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. यासाठी स्पीडगनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणणे, हेल्मेटचा वापर करणे तसेच परिवहन विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे याबाबत मोहिमेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेची राज्यातील अंमलबजावणी याबाबत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून आयुक्त भिमनवार (Vivek Bhimanwar) यांनी माहिती दिली आहे. (Road Safety)

(हेही वाचा – Mechanical Sweeping : दक्षिण मुंबईतील व्हिआयपींच्या रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडुद्वारे)

येथे ऐकता येणार मुलाखत 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात भिमनवार (Vivek Bhimanwar) यांची मुलाखत गुरुवार (८ फेब्रुवारी), शुक्रवार (९ फेब्रुवारी) आणि शनिवार (१० फेब्रुवारी) रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्युज ऑन ‘एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत रविवार ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक मकरंद वैद्य यांनी ही मुलाखत घेतली आहे. (Road Safety)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.