दहिसर चेक नाक्यावरील वाहतूककोंडी कमी करण्याच्या परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांच्या उपाययोजनेला यश

69
दहिसर चेक नाक्यावरील वाहतूककोंडी कमी करण्याच्या परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांच्या उपाययोजनेला यश

दररोज दहिसर चेक नाक्यावर होणारे वाहतूककोंडी कमी करण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सुचवलेला उपाययोजनाला यश आले असून या चेकनाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

एखाद्या समस्येचा पाठपुरावा केल्याशिवाय त्याच्यावर नेमका तोडगा निघत नाही, हे मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दहिसर टोल चेक नाक्याचा संदर्भात करून दाखवले. तब्बल तीन वेळा पाहणी करून, प्रत्येक वेळोवेळी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी संबंधित ठेकेदारांनी केली का नाही, याचा पाठपुरावा करून वाहतूककोंडीची समस्या बहुतांश सोडवण्यामध्ये मंत्र्यांना यश आले आहे.

(हेही वाचा – Moradabad मध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता; कुटुंबियांनी दिलशादवर केला लव्ह जिहाद आणि अपहरणाचा आरोप)

सध्या दहिसर चेक नाक्यावर दोन्ही बाजूला केवळ दोन-दोन लेन (दोन्ही बाजूने) अवजड वाहतुकीसाठी ठेवण्यात आले असून बाकीचा सर्व रस्ता मोकळा केलेला आहे. तसेच या संदर्भातील सूचना दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतरावर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हलक्या वाहनांना आपला वेग कमी न करता थेट टोलनाक्याच्या बाजूने विस्तीर्ण रस्त्यावरून पुढे जाता येते. याचबरोबर मुंबईकडे येणारी जड वाहतूक ही सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत मीरा-भाईंदर शहराच्या अलीकडेच रोखण्यात येणार आहे. त्यामुळे बाजूला लावलेल्या ट्रक मुळे रस्ता अरुंद होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे.

एवढे उपाय करून देखील भविष्यात वाहतूककोंडी होत राहिल्यास सदर टोल नाका केवळ एक लेन साठीच सुरू राहील! बाकीचा सर्व रस्ता मोकळा केला जाईल. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या परिवहन व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले! तसेच यापुढे वाहतूककोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.