मुंबई-गोवा महामार्ग सुरक्षित होणार! कसा ते वाचा

104
सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे, ते काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गावर काही ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करणार आहे, त्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाशी पत्र व्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

महामार्गावरील अपघाताचे ठिकाणे ओळखली जातील 

विधानसभा येथे आमदार भास्कर जाधव यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते. सध्या महार्गावर काम सुरु असताना परशुराम घाटात अपघात होऊन काही मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हे असे अपघात होऊ नये म्हणून सरकारने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

नितीन गडकरी पाहणी करणार 

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजाची प्रगती कुठवर आली आहे आणि त्या महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत आपण स्वतः महामार्गाची पहाणी करणार आहे. तसेच या महामार्गावर जी ठिकाणे अपघात प्रवण आहेत, ती निश्चित करून त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येईल. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटर उभारून तिथे जीव रक्षक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.