फक्त १४९९ रुपयांमध्ये करा हवाई प्रवास! ‘या’ विमान कंपनीची शानदार ऑफर

#PayDaySale अंतर्गत 1499 रुपयांपासून तुम्ही विमान तिकीट बुक करू शकता.

प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात एकदा तरी विमानाने प्रवास करण्याची इच्छा असते. परंतु अनेकवेळा विमानाचे तिकीट परवडत नाही किंवा येत्या काही महिन्यात तुम्ही विमान प्रवास करणार असाल तर आताच तुमची तिकीटे बुक करा. एअर एशिया इंडिया (AirAsia India) या विमान कंपनीने विमान प्रवाशांसाठी स्वस्त मस्त विमान प्रवासाची ऑफर आणली आहे.

( हेही वाचा : बेस्ट कामगार सेनेचे उपक्रमाला पत्र; ड्युटी शेड्युलमुळे कर्मचारी त्रस्त)

AirAsia India ने स्वस्त दरात विमान तिकीट बुक करण्याची ऑफर दिली आहे. एअर एशिया इंडियाच्या #PayDaySale अंतर्गत 1499 रुपयांपासून तुम्ही विमान तिकीट बुक करू शकता.

एअर एशियाची ही ऑफर २८ ते ३१ जुलैपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही विमान प्रवासाच्या तिकीट बुक केल्या तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. या योजनेअंतर्गत तिकीट बुकिंगवर १५ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरदरम्यान प्रवास करता येणार आहे. पहिल्यांदा लाभ घेणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ही ऑफर लागू करण्यात आली आहे.

तिकीट बुक कसे कराल?

  • #PayDaySale अंतर्गत तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला https://www.airasia.co.in या वेबसाईटवर जावे लागेल.
  • या ऑफरअंतर्गत २८ ते ३१ जुलैपर्यंत बुक होणाऱ्या तिकीटावर तुम्ही १५ ऑगस्टपासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रवास करू शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here