देशाच्या अनेक भागात थंडीची लाट आली असून यापार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला. आता जनरल तिकीटावर स्लीपर कोचमधून प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी एक रुपयांचे देखील अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
( हेही वाचा : बेस्टचा डिजिटल प्रवास! लवकरच ‘या’ मार्गांवर धावणार नव्या प्रिमियम बस)
काही कालावधीसाठी हा निर्णय लागू राहणार
देशभरात कडाक्याची थंडी पाहता भारतीय रेल्वेने जनरल तिकीट घेणारे प्रवासीही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतील, असा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय काही ठराविक काळासाठीच असेल. त्यामुळे जनरलचे तिकीट काढलेल्या लोकांना सुरक्षित प्रवास करणे सोपे होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी…
ज्या गाड्यांचे स्लीपर कोच 80 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतात, त्या ट्रेनची माहिती मागविण्यात आली आहे. प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वेच्या सर्व स्लीपर कोचचे रूपांतर जनरलमध्ये करण्याचा विचार रेल्वे करत आहे. हिवाळ्याच्या मोसमात अनेक प्रवासी स्लीपर कोचऐवजी एसी कोचने प्रवास करणे पसंत करत आहेत, त्यामुळे स्लीपर कोचमध्ये प्रवासी कमी आहेत. यामुळे रेल्वेने एसी कोच वाढविण्यास सुरुवात केली आहे. हिवाळ्याच्या हंगामामुळे स्लीपर कोचमधील 80 टक्के सीट रिकाम्या असतात. मात्र सामान्य तिकिटाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. हे पाहता रेल्वेने स्लीपर कोचला जनरल कोचचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.