बोरिवली ते ठाणे फक्त २० मिनिटांत प्रवास; तयार होणार भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

147

बोरिवली ते ठाणे हा दीड तासांचा प्रवास लवकरच १५ ते २० मिनिटांवर आणण्यासाठी भुयारी मार्ग प्रकल्पास सुरूवात झाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी पुढील दोन महिन्यांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून निविदा काढल्या जाणार आहेत. यासाठी जवळपास सात हजार कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.

( हेही वाचा : गृहिणींचे बजेट कोलमडले; अमूलनंतर आता ‘या’ कंपनीने वाढवले दुधाचे दर!)

भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

बोरिवली ते ठाणे दरम्यानचा प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे. सद्यस्थितीत बोरिवलीला जाण्यासाठी घोडबंदर रोडचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी येथे सतत वाहतूक कोंडीची समस्या असते. बोरिवली ते ठाणे या मार्गावर प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना १ ते दीड तास लागतो. या नव्या प्रकल्पामुळे हे अंतर फक्त १५ ते २० मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे.

११.८ किलोमीटर लांबीचा मार्ग

MMRDA कडून संजय गांधी उद्यानाच्या खालून ११.८ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी जवळपास सात हजार कोटी खर्च येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पुढील दोन महिन्यांमध्ये निविदा काढल्या जाणार आहेत. कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतर पाच वर्षांत या बोगद्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती एमएमआरडीने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.