तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला बरे होण्यासाठी मंत्रोपचार पद्धतीने बरे करण्यासाठी थेट मांत्रिक आणल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबतीतला व्हिडीओ समाजमाध्यमांवर बाहेर येताच रुग्णालय प्रशासनाने मांत्रिकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तलासरी रुग्णालयात सर्पदंश झाल्याने ठाकरपाडा येथील सोमा ठाकरे यांना नातेवाईकांनी उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात डॉक्टर्स ठाकरे यांच्यावर उपचार करत असताना नातेवाईक म्हणून आलेल्या इसमाने ठाकरे यांच्यासमोर मंत्रोच्चारास सुरुवात केली. या घटनेचा उपस्थित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी विरोध केला.
मंत्रोच्चारासह मांत्रिक विचित्र हावभाव करू लागल्याने उपस्थितांनी याबाबतचा व्हिडीओ व्हायरल केला. समाजमाध्यमांवर याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मांत्रिकाविरोधात कारवाईची मागणी होऊ लागली. अखेरीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ लखसिंग यांनी तलासरी पोलिस स्थानकात याविरोधात तक्रार केली.
(हेही वाचा – Tomato : ग्राहकांना दिलासा! टोमॅटोच्या दरात पन्नास टक्क्यांची घट; बाजारात आवक वाढली)
रुग्णाचा जावईच निघाला मांत्रिक!
रुग्णावर मंततंत्राने उपचार करणाऱ्या मांत्रिकाचे नाव सुभाष बेंडगा असे आहे. मांत्रिक ठाकरे यांचा जावई असल्याचे तपासाअंती उघडकीस आले. मांत्रिक सुभाष बेंडगा रुग्णाची मुलगी सोमा यांच्यासोबत रुग्णालयात आले होते. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ लखसिंग यांनी रुग्णाची मुलगी सोमा, जावई सुभष बेंडगा या दोघांच्या विरोधात स्थानिक पोलिस स्थानकात कारवाई केली.
ठाकरे यांची मुलगी सोमा आणि मांत्रिक जावई सुभाष बेंडगा यांच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध व समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्याचे एन. के. पाटील अधिक तपास करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community