वरळी आणि प्रभादेवीमध्ये झाड पडून झालेल्या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाने उद्यान विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीबाबत चिंता व्यक्त केली. प्राधिकरणाचा बैठकीनंतर, महापालिकेच्या उद्यान विभागाने तात्काळ सरसकट सर्वच झाडांच्या कापाकापीचे काम हाती घेतले आहे. (Tree Cutting)
मुंबईमध्ये मान्सुन पूर्व मृत झालेल्या झाडांची तसेच झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येते. त्यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागाने २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सर्व झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी जून महिन्याच्या आधीच पूर्ण केली. परंतु त्यानंतरही मुंबईतील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे वृक्ष उन्मळून पडणे तसेच फांद्या तुटून पडण्याचे अनेक प्रकार घडले आहे. त्यात अनेक झाडांची पडझड झाली. झाडांच्या फांद्याची छाटणी केल्यामुळे मुसळधार पावसात झाडे पडण्याचे प्रकार कमी होतात. परंतु फांद्यांची छाटणी केल्यानंतरही झाडे पडून दुर्घटना होत असल्याने उद्यान विभागाच्यावतीने सुरु असलेल्या छाटणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Tree Cutting)
(हेही वाचा – Milind Narvekar यांचे ‘ते’ स्वप्न झाले साकार)
झाडांच्या फांद्या तातडीने कापून घेण्याकडे उद्यान विभागाचा कल
जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात वरळीत एका ४५ वर्षीय तरुणाचा आणि प्रभादेवी एका कचरा वेचक महिलेचा झाड पडून दुर्देवी मृत्यू झाला. झाडांमुळे झालेल्या दुर्घटनांबाबत जिल्हा आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत चिंता व्यक्त करत झाडे पडली त्या झाडांचा मान्सूनपूर्व सर्वेत समावेश होता याची याची माहिती घेऊन चौकशी करण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या सहायक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. (Tree Cutting)
त्यामुळे या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील अनेक रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या कापण्याचे जोरात सुरु झाले आहे. मान्सून पूर्व कामाच्या दृष्टीकोनातून यापूर्वीच्या कंत्राटदाराकडून जुन पर्यंत झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यानंतरही ही झाडे पडू लागल्याने मुंबईकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता महापालिकेच्यावतीने सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीत सरसकट सर्वच झाडांच्या फांदीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ज्या झाडांच्या फांद्या अधिक आहेत, त्या झाडांच्या फांद्या तातडीने कापून घेण्याकडे उद्यान विभागाचा कल असल्याचे मागील तीन दिवसांपासून दिसून येत आहे. शनिवारी १३ जुलै रोजी दिवसभरात १६ झाडे पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये शहरात ०३, पूर्व उपनगरांत ०८ आणि पश्चिम उपनगरांत ०५ अशाप्रकारे झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. (Tree Cutting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community