- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत धोकादायक झाडांची आणि झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी (Tree cutting) केली जात असली तरी या वृक्षांची छाटणी केली जात नाही. त्यामुळे महापालिकेने झाडांच्या वैज्ञानिक छाटणीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत आणि फायर ऑडिटसाठी करत असलेल्या पॅनेलच्या धर्तीवर वृक्ष छाटणीसाठी आर्बोरिस्ट आणि वृक्ष तज्ञांचे पॅनेल हे करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Tree cutting)
महापालिका (Municipality) केवळ झाडांच्या दृश्य तपासणीच्या आधारे झाडांची छाटणी करते. मग नागरिकांनी शास्त्रोक्त पद्धतीने झाडांची छाटणी करावी, अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? वृक्ष छाटणीच्या नावाखाली झाडे तोडण्यात (Tree cutting) आल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. हे एक गंभीर चिंतेचे कारण आहे. यातच आता महापालिकेने खासगी गृहनिर्माण तसा आणि इतर मालमत्ता आदींना त्यांच्या हद्दीतील झाडे कापण्यासाठी नोटिसा बजावले आहे. या पार्श्वभूमीवर कुलाबा येथील माजी नगरसेवक ऍड.मकरंद नार्वेकर (Makarand Narvekar) यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांना पत्र लिहून या प्रकारची मागणी केली. महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रात नार्वेकर यांनी महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवारात शास्त्रोक्त पद्धतीने झाडांची छाटणी करण्यास सांगणाऱ्या 3,500 नोटिसांबाबत माध्यमात आलेल्या बातम्यांचा संदर्भ दिला. (Tree cutting)
“आर्बोरिस्ट, झाडांची छाटणी करणाऱ्या एजन्सी किंवा तज्ञांचे मार्गदर्शन नसल्यानें या नोटिसांमुळे वृक्ष छाटणीत ठोस परिणाम मिळण्याची शक्यता नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.वृक्षांची छाटणी शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी यासाठी महापालिकेने सर्वसामान्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तातडीने तयार करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. (Tree cutting)
फायर ऑडिटसाठी नेमलेल्या एजन्सी पॅनेलच्या धर्तीवर
महापालिकेने (Municipality) फायर ऑडिटसाठी एजन्सीचे पॅनेल तयार केले त्याच धर्तीवर गृहनिर्माण सोसायट्यांमधील झाडांची छाटणी करण्यासाठी तज्ञ पॅनेल नेमावे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना शास्त्रोक्त पद्धतीने झाडांची छाटणी करणे शक्य होईल. आत्तापर्यंत गृहनिर्माण सोसायट्यांना झाडांच्या छाटणीसाठी नोटिसा जारी केल्याने त्यांना जबाबदार धरले जाते, परंतु शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणीचा प्रश्न सुटत नाही. जो शहरातील जीवघेण्या वृक्षतोडीच्या घटना टाळण्यासाठी महत्त्वाचा आहे, असे नार्वेकर पुढे म्हणाले. (Tree cutting)
कुलाबावासीयांनी शास्त्रोक्त वृक्ष सर्वेक्षण केले
गेल्या वर्षी कुलाबा येथे वृक्ष सर्वेक्षण करण्याच्या त्यांच्या घेतलेल्या पुढाकाराबाबत बोलताना नार्वेकर म्हणाले की, ॲमेनिटी ट्री केअरचे आर्बोरिस्ट वैभव राजे यांच्याशी संपर्क साधला होता. “झाड पडणे आणि दुर्दैवी जीवघेण्या घटना टाळण्यासाठी महापालिकेने अशाच प्रकारचे सर्वेक्षण शहरभरात आर्बोरिस्टकडून केले पाहिजे. या सर्वेक्षणांमुळे झाडांचे आरोग्य तपासण्यात मदत होईल आणि वृक्षतोड आणि छाटणी टाळता येईल. (Tree cutting)
झाडांच्या छाटणीमध्ये नालेसफाई आणि ट्रान्सपोर्ट कंपन्या सामील
महापालिकेने वृक्षतोड आणि छाटणीमध्ये तज्ञ एजन्सी नेमण्यात असल्याचा दावा करतात. मात्र त्या कंपन्या तज्ञ नाहीत. “डोमेन नॉलेज नसलेल्या कंत्राटदारांच्या नियुक्तीमुळे शहरातील मौल्यवान झाडे मरत आहेत. झाडांची छाटणी आणि छाटणीच्या नावाखाली मुंबईतील ग्रीन कव्हरचे नुकसान करणाऱ्या नालेसफाई आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांची पार्श्वभूमी असलेले कंत्राटदार वृक्ष छाटणीमध्ये नेमले आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. (Tree cutting)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community