- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे आणि झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणीचे काम मागील दोन दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून महापालिकेच्या वतीने करण्यात येते परंतु आजवर कधीही रस्त्यावरील वाहनांना बाबत चिंता व्यक्त न करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या वतीने वाहन चालकांना तथा मालकांना इशारा देण्यात देण्यात येत आहे. मात्र मात्र या झाडांच्या फांद्या छाटणी रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत असल्या असल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आजवर अशाच प्रकारे वाहने असताना फांद्यांची छाटणी होत असताना यंदाच्या वाहनांचा अठरा कसा काय होतो असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. मात्र ही भीती म्हणजे फांद्या छाटणीत होणारा निष्काळजीपणा हा यंदा खपवून घेतल्या जाणार नसल्याने कंत्राटदारांचे हे अपयश झाकण्यासाठी केला जाणारा केविलवाणा प्रकार तसेच निर्माण केलेले वातावरण असल्याचा आरोप दबक्या आवाजात ऐकल्या आवाजात ऐकायला मिळत आहे. (Tree cutting)
(हेही वाचा- Israel-Iran Attack: इस्रायलने दिले इराणला प्रत्युत्तर; लष्करी तळ, अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ले)
रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा !
पावसाळा सुरू होण्याआधी खबरदारी म्हणून मुंबईत महानगरपालिकेच्या (Mumbai Municipality) उद्यान विभागाने मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधीच अवगत करण्यात येते. तसेच या कार्यवाहीत प्रशासनाला सहकार्य करून आपापली वाहने अशा ठिकाणांहून काढून घ्यावीत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. झाडांच्या फांद्या छाटणीदरम्यान जर दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले, तर महानगरपालिका त्यास जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. (Tree cutting)
यंदाच हे प्रश्न का उपस्थित होत आहेत…
मुंबई महापालिका (Mumbai Municipality) प्रथमच रस्त्याकडेच्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करत आहे का असा सवाल काही वृक्ष तज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केला जात आहे. मागील दोन दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून झाडांच्या फांद्यांची छाटणी होत आहे. मात्र, आजवर कधीही वाहनांचे होणारे नुकसान किंवा वाहन चालकांच्या समस्या याबाबत महापालिकेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते. मग यंदाच हे प्रश्न का उपस्थित होत आहे, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे. (Tree cutting)
…त्यांची छाटणी केली जायची
विशेष म्हणजे मागील दशकाच्या तुलनेत यंदा फांद्या छाटणीच्या कामांमध्ये क्रेन आणि ट्रॉलीचा वापर केला जात आहे. त्यामुळे अत्याधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर होत असतानाही असे प्रश्न उपस्थित होणे हे महापालिकेच्या अकार्यक्षमतेच लक्षण आहे. महापालिका प्रशासन यापूर्वी शास्त्रोक्तपणे फांद्यांची छाटणी करताना ज्या झाडांच्या फांद्या बाहेरच्या दिशेला झुकलेल्या आहेत, त्यांची छाटणी करत होते. जेणेकरून फांद्यांच्या तोल एका बाजूला जाऊन वादळी वाऱ्यांमुळे ते कोसळणार नाही. किंबहुना त्या फांद्या तुटून पडणार नाहीत, याची काळजी घेतली जात होती. (Tree cutting)
काही लाकूड माफिया हे या कंत्राट कामांमध्ये गुंतलेले
परंतु आता काही लाकूड माफिया हे या कंत्राट कामांमध्ये गुंतलेले असल्याचे आरोप होत आहेत. या फांदी छाटण्याचा कामांमध्ये त्यांचा कल हा जाड फांद्या तसेच खोडापर्यंत छाटणीकडे कल असतो. अशी छाटणी केल्यास त्यांना जास्तीत जास्त मोठी लाकडे मिळतात. त्यामुळेच मोठमोठी कशी मिळतील यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अशी मोठी लाकडे मिळवण्यासाठी होणाऱ्या छाटणीमुळेच खाली असलेल्या गाड्यांवर त्या फांद्या पडू त्यांचं नुकसान होते. यापूर्वी कधीही वाहनांच्या बाबत असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले नव्हते. कारण हलक्या छोट्या फांद्या तोडल्या जात असल्यामुळे खाली वाहने उभी असली तरी वाहनांचे नुकसान होत नव्हते. पण आता मोठ्या लाकडांच्या हव्यासा पोटी थेट बुंध्यापर्यंत झाडांची छाटणी केली जात असल्याने हा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. (Tree cutting)
दुर्घटना झाल्यास त्यातून वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न
जर विभाग कार्यालयाकडून अवगत करण्यात येत असते असे प्रशासन म्हणत असेल तर त्यांनी सांगूनही वाहने काढली जात नसतील तर वाहतूक पोलिसांना सांगून त्या टोविंग करून नेण्याची प्रोविजन आहे. मग त्याचाही अवलंब प्रशासन करू शकते. पण कुठे तरी भविष्यात फांद्या पडून किंवा झाड उन्मळून पडून दुर्घटना झाल्यास त्यातून वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. (Tree cutting)
वाहनतळ अभावी अनेक वाहने रस्त्यावरच उभी…
काही तज्ज्ञांच्या मते तर सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे, त्या तुलनेत वाहनतळाची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे अनेक वाहने ही रस्त्यावरच उभी आहेत. वाहनतळ उपलब्ध असती तर लोकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या नसत्या. पण सुविधा द्यायच्या नाहीत आणि वाहन मालक तथा चालकांवरच जबाबदारी टाकायची ही भूमिका योग्य नाही. (Tree cutting)
जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित ९६ हजार ९०७ झाडांची छाटणी पूर्ण..
मुंबईत साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. यंदा मुंबईत एकूण १ लाख १२ हजार ७२८ झाडांची छाटणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १२ एप्रिल २०२४ अखेरपर्यंत १५ हजार ८२१ झाडांची छाटणी झाली आहे. ७ जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित ९६ हजार ९०७ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली ४१४ झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी ३३८ झाडे काढून टाकण्यात आली असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी (Jitendra Pardeshi) सांगितले. खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही परदेशी यांनी केले आहे. (Tree cutting)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: नागपुरात नितीन गडकरींसह ‘या’ मान्यवरांनी केले मतदान, जाणून घ्या…)
३ हजार ६९० जणांना नोटिसा…
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महानगरपालिकेद्वारे नियमितपणे राखण्यात येते. तथापि, गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय – निमशासकीय संस्था, खासगी जागा याठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या वृक्षांच्या छाटणीकामी, संतुलित करण्याबाबत महानगरपालिकेने ३ हजार ६९० नोटिसा दिल्या आहेत. (Tree cutting)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community