शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई, ठाणे परिसरात पावसाने धुमाकूळ घातल्याने विसर्जनाला जाणा-या गणेश भक्तांची चांगलीच गैरसोय झाली. दरम्यान ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावर झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व जखमी सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 जण जखमी
ठाण्यातील कोलबाड येथे असलेल्या कोलबाड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपावर आणि बाजूला उभ्या असणा-या दोन गाड्यांवर मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. यामध्ये तिघांना किरकोळ जखमा झाल्या असून अनेय 2 जखमी रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
बचावकार्य सुरू
या दुर्घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी,वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्यामार्फत सध्या बचावकार्य सुरू आहे.
जखमींची नावे
राजश्री वालावलकर (वय वर्ष अंदाजे 55)
प्रतिक वालावलकर (वय वर्ष अंदाजे 30)
या दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किविन्सी परेरा(40)
सुहासिनी कोलुंगडे(56)
दत्ता जावळे(50)
हे तिघे जण किरकोळ जखमी झाले असून सर्वजण सुखरुप आहेत.
Join Our WhatsApp Community