Tree Top Walk याचे लोकार्पण, एकाच वेळी २०० जणांनाच प्रवेश

68
Tree Top Walk याचे लोकार्पण, एकाच वेळी २०० जणांनाच प्रवेश
Tree Top Walk याचे लोकार्पण, एकाच वेळी २०० जणांनाच प्रवेश
  • मुंबई, विशेष प्रतिनिधी

मलबार हिल परिसरात निर्मित निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या हस्ते रविवारी ३० मार्च २०२५ रोजी करण्यात आले. याठिकाणी भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तसेच परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. मार्गावर एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एकावेळी २०० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

WhatsApp Image 2025 03 30 at 6.35.55 PM 1 scaled

सिंगापूर (Singapore) येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ (Tree Top Walk) या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे.या लोकार्पण प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani), उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

(हेही वाचा – Hindu : हिंदू ग्राहक जागृती अभियानाचा शुभारंभ; हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी-विक्री व्यवहार ठेवायला हवा; डाॅ. सच्चिदानंद शेवडे यांचे आवाहन )

याप्रसंगी बोलतांना लोढा म्हणाले की

निसर्गाचा समतोल राखत महानगरपालिकेने अतिशय प्रयत्नपूर्वक मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग साकारला आहे. हे ठिकाण मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरेल. हा प्रकल्प पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही जनजागृतीसाठी आदर्श ठरेल. अधिकाधिक मुंबईकरांनी या निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यावी आणि निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केले.

निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयीसुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले आहेत. तसेच पर्यावरणीय दृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे, त्यामुळे याठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याचेही निर्देश गगराणी यांनी दिले.

विशेष म्हणजे झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. रविवारी ३० मार्च २०२५ पासून हा उन्नत मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे.

(हेही वाचा – कामगारांच्या सुरक्षेबाबत तडजोड करू नये, Uday Samant यांचे आवाहन)

ऑनलाईन तिकिट नोंदणी

निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाईन तिकीट काढण्याचा पर्याय आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तसेच परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. मार्गावर एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एकावेळी २०० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) करण्यात आले आहेत. तसेच ऑनलाईन तिकिट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्याने प्रवेश आणि निर्गमसाठीचा पर्याय देण्यात आला आहे. अशा पद्धतीचे नागरिकांची नोंद करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक्सेस कंट्रोल सिस्टिम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प नियंत्रण कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशेष मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणारे प्राणी न्याहाळण्यास याठिकाणी मिळणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.