अतिक्रमणांनी वेढलेल्या प्रभादेवीतील Matkar Marg वर झाडे बहरुन फुलपाखरेही बागडणार

246
अतिक्रमणांनी वेढलेल्या प्रभादेवीतील Matkar Marg वर झाडे बहरुन फुलपाखरेही बागडणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

प्रभादेवी येथील एस. एल. मटकर मार्गावरील (Matkar Marg) तब्बल ३९ अनधिकृत बांधकामे हटवून येथील जागा अतिक्रमण मुक्त केल्यानंतर आता या जागेचा पर्यावरणपूरक उपयोग करण्यात आला आहे. एकेकाळी अतिक्रमणाने व्याप्त असलेल्या जागेवर तब्बल दोनशे पेक्षा अधिक मियावकी पद्धतीने झाडांची रोपे लावून सुंदर अशी हिरवळ फुलविण्यात आली आहे. रोपट्यांमध्ये सुपारी, अरेका पाम, ड्रेसिना, मुसांडा, पेडीलॅन्थस, टॅबरनामोंटाना, ॲकालीफा, लॅनटेना सारख्या विविध पर्यावरणपूरक व शोभीवंत रोपांचा समावेश आहे. ‘अरेका पाम’ या झाडाच्या आगळ्या वैशिष्ट्यांबाबत उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा वृक्ष हवेतील वायू प्रदूषके शोषून घेतो. तसेच या झाडांवर फुलपाखरेही आकर्षित होणार आहे.

‘जी दक्षिण’ विभाग कार्यक्षेत्रातील प्रभादेवी परिसरात एस. एल. मटकर मार्ग (Matkar Marg) हा एक प्रमुख रस्ता आहे. मात्र, या मार्गावरील पदपथालगत आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना या मार्गावरून चालताना गैरसोईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या ३९ अनधिकृत बांधकामांबाबत कायदेशीर प्रक्रियेनंतर जानेवारी २०२५ मध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वात जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे आणि विभागाच्या चमुने हटवण्याची कारवाई केली.

New Project 2025 03 22T173405.228

(हेही वाचा – Narayan Rane यांचा दिशा सालियन प्रकरणी मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा दोनदा फोन आला, अन्…)

या कारवाईअंती ३९ बांधकामे हटविल्यानंतर एस. एल. मटकर मार्गाचे (Matkar Marg) रुंदीकरण करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यालगत उपलब्ध झालेल्या खुल्या जागेमध्ये विविध पर्यावरणपूरक झाडांची दोनशेपेक्षा अधिक रोपटी शास्त्रशुद्ध पद्धतीने लावण्यात आली आहेत. या रोपट्यांची निवड करण्यासह ही रोपटी शास्त्रशुद्ध पद्धतीने लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सहकार्य घेण्यात आले आहे. यानुसार लावण्यात आलेल्या रोपट्यांमध्ये सुपारी, अरेका पाम, ड्रेसिना, मुसांडा, पेडीलॅन्थस, टॅबरनामोंटाना, ॲकालीफा, लॅनटेना सारख्या विविध पर्यावरणपूरक व शोभीवंत रोपांचा समावेश आहे. ‘अरेका पाम’ या झाडाच्या आगळ्या वैशिष्ट्यांबाबत उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा वृक्ष हवेतील वायू प्रदूषके शोषून घेतो. तसेच या झाडांवर फुलपाखरेदेखील आकर्षित होतात.

या वृक्ष लागवडीमुळे परिसरातील हिरवाई वाढण्यासोबतच पर्यावरपूरकताही जपली जाणार आहे. पर्यायाने हा परिसर प्रदूषणमुक्त होण्यासही मदत होणार आहे. वृक्ष लागवडीसह या खुल्या भूखंडावर एस. एल. मटकर मार्गालगत (Matkar Marg) २ मीटर रुंदीचा पदपथ काँक्रीटमध्ये बांधण्यात आला आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोठा पदपथ उपलब्ध झाला असून त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना बहरणाऱ्या हिरवाईचाही अनुभव आता घेता येणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी जी दक्षिण विभागाच्या उद्यान विभागाचे उप उद्यान अधिक्षक अविनाश यादव यांच्या चमुनेही अधिक मेहनत घेतली. ही झाडे मुंबईचे पर्यावरण समृद्ध करण्यातील आपला खारीचा वाटा जपत परिसरातील मुंबईकरांना एक सुखद अनुभवही देत आहेत. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांसह पर्यावरणाचे अभ्यासकही कौतुक करित आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.