Central Railway ची जबरदस्त कमाई; नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातून कमावले ‘इतके’ कोटी रुपये

142
मध्य रेल्वेने यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात प्रवासी भाड्यातून नोव्हेंबर २०२४ पर्यंत ४,९६६ कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहेत. गेल्यावर्षी याच काळात मध्य रेल्वेने प्रवासी वाहतूकीतून ४,६९९ कोटी रुपये मिळविले होते. अशा प्रकारे प्रवासी भाड्यातून मिळालेल्या उत्पन्नात ५.६८ % टक्क्यांची वाढ झाली आहे. (Central Railway)
मध्य रेल्वेने नोव्हेंबरमध्ये १३ कोटी ८० लाख (central railway passenger fare) प्रवाशांनी प्रवास केला असून त्यांत १२ कोटी २० लाख उपनगरी आणि १ कोटी ६० लाख मेल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून  ५५४ कोटींचा महसूल मिळवला आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मेल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून मिळाले असून, ते ४७० कोटी आहेत.
(हेही वाचा – मंत्री Nitesh Rane यांचं मोठं विधान; राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणणार)
मध्य रेल्वेला (Central Railway Earnings) २०२४-२५ या आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातून ४,९६६ कोटी उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत १०६ कोटी ४० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत मिळालेले उत्पन्न ४,६९९ कोटी होते. त्यात ५.६६ टक्क्यांची वाढ झाली. तसेच प्रवासी संख्येमध्ये २.३५ टक्क्यांची वाढ झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Phoenix Mall Kurla : मुंबईतील सगळ्यात मोठा मॉल कुठला?)

मध्य रेल्वेवर मुंबईमधून (Mumbai Local Railway) दररोज १८१० उपनगरीय गाड्या तसेच २०० पेक्षा अधिक मेल/ एक्स्प्रेस चालविल्या जातात. लोकलने दररोज ३५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असून  एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या गेल्या ७ महिन्यांमध्ये  ९३ कोटी ६० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. या माध्यमातून ६३८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर मेल एक्स्प्रेसने (Mail Express) दररोज ३ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून, याच कालावधीत १०६ कोटी ४० लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यांच्या माध्यमातून ४,३२८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.