दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागात बुधवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरजवळ होता.
यासोबतच नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुपारी १.३० वाजता येथे ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील पिथौरागढपासून १४३ किमी पूर्वेला होता. त्याची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.
गेल्या काही महिन्यांपासून नेपाळमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वी, २४ जानेवारीला नेपाळमध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तसेच, नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली आणि एनसीआरमध्ये १.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणामध्ये होता. या भूकंपाची खोली ५ किलोमीटर इतकी होती. गुरुवारच्या भूकंपाच्या आधी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी दिल्लीत २.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता. दुसरीकडे, १२ नोव्हेंबर रोजी ५.४ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
(हेही वाचा – बहिण असावी तर अशी! चिमुकलीने तुर्की भूकंपात अडकलेल्या आपल्या लहान भावाचा वाचवला जीव)