Ram Mandir Sam Pitroda : राममंदिराचा ट्रेंड माझ्यासाठी त्रासदायक; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना राममंदिराविषयी पोटशूळ

Ram Mandir Sam Pitroda : ''राममंदिरात होणारी प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटनाची तयारी यांमुळे धर्माला जास्त महत्त्व दिले आहे. सगळ्या देशात राममंदिराचा ट्रेंड आहे, जो माझ्यासाठी त्रासदायक आहे'', अशी टीका सॅम पित्रोदा यांनी केली आहे.

244
Ram Mandir Sam Pitroda : राममंदिराचा ट्रेंड माझ्यासाठी त्रासदायक; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना राममंदिराविषयी पोटशूळ
Ram Mandir Sam Pitroda : राममंदिराचा ट्रेंड माझ्यासाठी त्रासदायक; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना राममंदिराविषयी पोटशूळ

देशभर अयोध्येतील (Ayodhya) राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद साजरा केला जात आहे. (Ram Mandir Sam Pitroda) अयोध्यानगरीत सोहळ्याची तयारी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. देशभरातील भाविक अर्पण पाठवत आहेत. या सगळ्या आनंदमय वातावरणात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. ”राममंदिरात (Ram Mandir) होणारी प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटनाची तयारी यांमुळे धर्माला जास्त महत्त्व दिले आहे. सगळ्या देशात राममंदिराचा ट्रेंड आहे, जो माझ्यासाठी त्रासदायक आहे”, अशी टीका सॅम पित्रोदा यांनी केली आहे.

(हेही वाचा – Israel Embassy Attack : इस्रायलने जारी केल्या भारतातील इस्रायलींसाठी सूचना !)

पंतप्रधान मोदींनी मंदिरांमधील फेऱ्या थांबवल्या पाहिजेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे त्यांचा जास्तीत जास्त वेळ मंदिरांमध्ये घालवत आहेत. याच गोष्टीची मला चिंता वाटते. मला वाटते त्यांनी शाळांमध्ये वेळ घालवला पाहिजे. विज्ञान केंद्रांमध्ये गेले पाहिजे, तसेच वारंवार मंदिरांमधील फेऱ्या थांबवल्या पाहिजेत. देशात धर्माला जास्त महत्त्व दिले जाते. मात्र काय महत्त्वाचे आहे ? राममंदिर (Ram Mandir) कि बेरोजगारी (Unemployment) ? अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करून पित्रोदा यांनी राममंदिराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

धर्माला अजेंडा म्हणून वापरणे गैर

सॅम पित्रोदा (Sam Pitroda) पुढे बोलतांना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लोकशाहीची मूल्ये कमी करत आहेत. १० वर्षे ते पंतप्रधान आहेत, मात्र त्यांनी अद्याप एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. मला या गोष्टीची चिंता वाटत आहे. आपला देश चुकीच्या दिशेने चालला आहे किंवा भरकटतो आहे, असेच मी म्हणेन. धर्म (Dharma) हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. धर्माला राष्ट्रीय अजेंडा म्हणून वापरणे चुकीचे आहे. देशाचा अजेंडा हा शिक्षण, रोजगार, विकास, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्यसेवा, पर्यावरण आणि प्रदूषण निर्मूलन हा असला पाहिजे. याच मूल्यांच्या आधारे तुम्ही एका आधुनिक राष्ट्राची निर्मिती करू शकता. मला या गोष्टीशी काही घेणे-देणे नाही की, तुम्ही कुठला धर्म मानता ?, असेही सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – JN.1 Variant: कोरोनाचा नवीन JN.1 व्हायरस ४१ देशांमध्ये पसरला, जागतिक आरोग्य संघटनेने दिला सल्ला; वाचा सविस्तर)

म्हणे धर्माचे राष्ट्रीयकरण करू नका

सॅम पित्रोदा (Sam Pitroda) म्हणतात, ”कोण कुठला धर्म मानतो ? यासाठी मी कुणाचा आदर करत नाही, तो प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे. त्याचप्रमाणे कोण काय खाते ? कोण कसे कपडे परिधान करते, यालाही महत्त्व नाही, कोण कुणाची पूजा करते, हा देखील व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र संपूर्ण देश जर राममंदिराच्या (Ram Mandir) पूजेत आणि रामजन्मभूमीचा (Ram Janmabhoomi) उदो उदो करण्यात अडकत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे, त्याचं राष्ट्रीयकरण करू नका.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.