पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली आहे. येत्या १० फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई येथून या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंदे भारत घाटामधून कसा प्रवास करते याची चाचपणी घेण्यात आली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून जवळपास सकाळी ११ वाजता वंदे भारत निघाली आणि इगतपुरी दरम्यान ती एक ते दीड ते वाजेच्या सुमारास पोहोचली. या गाडीमध्ये रेल्वेचा ठराविक स्टाफ व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणी फेऱ्या
कसारा विभाग घाट सेक्शन असल्याने येथून मार्गस्थ होणाऱ्या रेल्वे गाड्यांना घाट चढण्यासाठी मागून बँकर (इंजिन) लावावे लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेसने बिना बँकर घाट पार केला असून तिला कुठल्याही प्रकारचे बँकर लावण्यात आलेले नाहीत. या गाडीच्या दोन ते तीन दिवस चाचणी फेऱ्या होणार आहेत असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
वंदे भारत ट्रेन बघण्यासाठी नागरिकांनी इगतपुरी स्थानकावर गर्दी केली होती. सदरील गाडी मंगळवार वगळता नियमितपणे मुंबई-शिर्डी धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी शिर्डीकडे रवाना होणार आहे. तर शिर्डी रेल्वे स्थानकात दुपारी 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच शिर्डीहून सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघणार आहे, तर मुंबईत रात्री 11 वाजून 18 मिनिटांनी पोहोचणार आहे. भारत एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी 5 तास 55 मिनिटात प्रवास होणार आहे. मुंबई-सोलापूर बरोबरच मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत असल्याने साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Join Our WhatsApp CommunityIn a first, Vande Bharat navigates through two steepest ghats of India. pic.twitter.com/oe1Ro7hpyz
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 4, 2023