-
प्रतिनिधी
राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत राज्यातील आदिवासी आमदार, खासदार, मंत्री आणि आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी थेट आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या समस्या समजून घेणार आहेत. (Tribal Ashram Schools)
हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला असून त्याला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. या उपक्रमांतर्गत ७ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुक्कामी राहणार आहेत. यासोबतच राज्यभरातील २६ आदिवासी आमदार आणि ४ खासदार स्थानिक आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थी व शिक्षकांशी थेट संवाद साधणार आहेत. (Tribal Ashram Schools)
विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी थेट शाळेत मुक्काम
या उपक्रमाद्वारे आश्रमशाळांमधील शैक्षणिक सुविधा, वसतिगृहांची स्थिती, पोषण आहार, आरोग्य सेवा, मूलभूत सुविधा यांची पाहणी केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना आणि आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. (Tribal Ashram Schools)
मंत्री, आमदार आणि खासदार थेट विद्यार्थ्यांसोबत राहून त्यांचे प्रश्न समजून घेतील. जेवणाची गुणवत्ता, वसतिगृहातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य तपासणी, शिकवण्याची पद्धत, शिक्षकांची उपलब्धता आणि इतर मूलभूत सुविधा यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. (Tribal Ashram Schools)
(हेही वाचा – Mahakumbhmela 2025 : सर्वाधिक दूषित पाणी महाकुंभमेळ्यात; सपा नेत्या जया बच्चन यांचे संतापजनक विधान)
सरकारचा ठाम निर्धार – दर्जेदार शिक्षण आणि सुविधा
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” हा उपक्रम फक्त पाहणी करण्यापुरता मर्यादित न ठेवता, त्यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी ठोस निर्णय घेण्यात येणार आहेत. (Tribal Ashram Schools)
“हा उपक्रम म्हणजे केवळ औपचारिकता नाही, तर विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची मोठी अपेक्षा आहे. (Tribal Ashram Schools)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community