सेवा विवेक सामजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी महिलांनी दिवाळीसाठी बांबूपासून पर्यावरणपूरक कंदील तयार केले आहेत. दिवाळीचा सण जवळ आल्याने या महिलांनी बनवलेल्या कंदिलांना उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी मिळत आहे .
पालघर जिल्हातील विविध गावातील आदिवासी महिला सेवा विवेक सामजिक संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. येणाऱ्या दिवाळी सणासाठी नागरिकांनी चायना कंदील न घेता पर्यावरणपूरक बांबूपासून बनलेले कंदील घ्यावे, अशी विनंती येथील महिलांनी केली आहे. या आदिवासी महिला शेतकरी असून सेवा विवेक सामजिक संस्थेने दिलेल्या बांबूपासून हस्तकला या प्रशिक्षण वर्गात त्यांना विविध दर्जेदार वस्तू तयार करायला शिकल्या आहेत. आपण या आदिवासी महिलांनी तयार केलेले कंदील घेऊन संस्थेच्या कामात हातभार लावावा, अशी संस्थेच्या प्रशिक्षण व विकास अधिकारी प्रगती भोईर यांनी विनंती केली आहे. महिलांनी तयार केलेले कंदील सेवा विवेकच्या वेबसाइट www.sevavivek.com var विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच आपण प्रगती भोईर 7798711333 ह्यांना संपर्क करून हे कंदील घरपोच मागवू शकता.
( हेही वाचा: हलाल विरोधातील लढाई आता सुरु, परिणाम दिसताेय – माजी खासदार डॉ. विजय सोनकर शास्त्री )
आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांना प्रशिक्षण
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते. पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.
Join Our WhatsApp Community