भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला ५२वर्षे पूर्ण झाली. याच विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी शनिवारी ( ४ नोव्हेंबर) लष्कराच्या दक्षिण कमांडने पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा संकुलात मोटर सायकल डेअर डेव्हिल शो आयोजित केला होता. (Tribute to Indian soldiers of 1971 war)
भारतीय लष्करातील, हा मोटर सायकल चालक चमू, “द डेअर डेव्हिल्स”, चमू म्हणून ओळखला जातो. जबलपूर इथल्या मुख्यालयात सिग्नल प्रशिक्षण केंद्रात १९३५ पासून या चमूला प्रशिक्षण दिले जाते. गेल्या अनेक वर्षात, या चमूने अनेक महत्वाच्या कामगिऱ्या यशस्वी केल्या आहेत आणि आतापर्यंत २९ जागतिक विक्रम रचले आहेत. गिनीज आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस यांच्याकडून त्यांच्या विक्रमांची नोंद देण्यात आली आहे. सुभेदार प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली २८ इतर धाडसी मोटार सायकल स्वारांच्या या ‘डेअर डेव्हिल्स’चे हे पथक आहे. जबलपूर चा अभिमान असलेले, ‘डेअर डेव्हिल्स’ केवळ त्यांच्या व्यवसायातच पारंगत नाहीत तर त्यांनी मोटार सायकलवर ‘अतिशय धैर्याने आणि अचूकतेने मानवी रचना रचणे यात देखील ते पारंगत आहेत. त्यांनी अत्यंत रोमांचक आणि धाडसी कवायती करून, दुचाकीवरील ३८अशा विलक्षण आणि अद्भुत मानवी रचनांचा त्यात समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ३००० हून अधिक लष्करी अधिकारी , जवान, माजी सैनिक, महिला आणि मुले उपस्थित होती. दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ आणि कर्नल कमांडंट कोअर ऑफ सिग्नल्स लेफ्टनंट जनरल मंजीत कुमार यांनी यावेळी डेअर डेव्हिल्सचा सत्कार केला.
या कार्यक्रमात १९७१ च्या युद्धात विजय सुनिश्चित करणारे शूर भारतीय सैनिक, नौसैनिक आणि हवाई योद्धे आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी आदरांजली वाहिली. १९७१ च्या विजयाच्या आठवणी आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात ताज्या आहेत आणि त्या आठवणींचा हा उत्सव आहे. त्याच वेळी,हे पर्व १९७१च्या युद्धात आपल्या सैन्याने दाखवलेला आवेश, धैर्य आणि शौर्याचे प्रतीक आहे. याच आवेशाने आणि हिरिरीने देशाला प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना यावेळी उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community