Veer Savarkar यांच्या ५९व्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे विविध कार्यक्रम संपन्न

बागेश्री ग्रुप नाशिक आणि संस्कार भारती यांच्या वतीने 'ने मजसी ने परत मातृभूमीला' या विषयावर एक अनोखा संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला.

34

भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) ५९व्या आत्मार्पण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या जन्मस्थळाला असंख्य सावरकरप्रेमींनी भेट देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.

bhagur1

सकाळी बागेश्री ग्रुप नाशिक आणि संस्कार भारती यांच्या वतीने ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या विषयावर एक अनोखा संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. सदर कार्यक्रम चारुदत्त दीक्षित मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख एकनाथराव शेटे, खंडेराव खैरनार, डॉ. मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, मधुकर कापसे आणि विलास कुलकर्णी यांसारखे मान्यवर उपस्थित होते. स्मारकाच्या वतीने व्यवस्थापक भूषण कापसे आणि परभणीचे मिलिंद पावगी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकाळी ८ वाजता नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये १०० विद्यार्थ्यांच्या संचलनाने सावरकरांना अभिवादन करण्यात आले.

bhagur2

(हेही वाचा Veer Savarkar आध्यात्मिक होते, पण…; गोपाळ सारंग काय म्हणाले ?)

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) जयंती उत्सव समितीच्या वतीने रमेश पवार, प्रताप पवार, मुकुंद देशमुख, अशोक मोजाड, प्रशांत कापसे आदी सदस्यांनी अभिवादन केले. भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने मनोज कुवर, योगेश बुरके, प्रशांत लोया, मंगेश मरकड, प्रसाद आडके, गणेश राठोड यांनी सावरकरांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून आदर व्यक्त केला. या कार्यक्रमांनी सावरकरांच्या (Veer Savarkar) योगदानाची आठवण करून दिली, तसेच त्यांच्या देशप्रेमाचा वारसा जपण्याचा संदेश दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.