खलिस्तानी समर्थकांनी भारताविरोधी निदर्शने केली. (Khalistan Protest) यावेळी त्यांनी तिरंग्याचा अपमान केला. टोरांटो येथील भारतीय दुतावासाबाहेर ही निदर्शने करण्यात आली होती.
(हेही वाचा – Raste vikas App : ग्रामीण भागातील रस्ते दाखवणारे नवीन ॲप येणार; ठाणे जिल्हा परिषदेचा उपक्रम)
या निदर्शनादरम्यान खलिस्तानींनी पुन्हा एकदा तिरंग्याचा अपमान केला. रस्त्यावर तिरंगा पसरवून त्यावर बूट ठेवले आणि त्यानंतर त्यांनी तो तिरंगा पेटवला. कॅनडातील खलिस्तानी समर्थक भारतीय दुतावासाबाहेर जमले होते. त्यांनी यावेळी भारतविरोधी निदर्शने सुरू केली. यावेळी त्यांनी निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यासोबतच कॅनडामध्ये स्थापन होणाऱ्या हनुमानाच्या सर्वात उंच पुतळ्याबाबतही प्रश्न उपस्थित केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community