Trimbakeshwar : सन २०२७ मध्ये नाशिक (Nashik) येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा (Trimbakeshwar Temple ‘A’ grade) देण्यात आला आहे. या निर्णयामुळे श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे. नगरविकास विभागाने गुरुवार २७ मार्चला यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. (Trimbakeshwar)
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (Shree Kshetra Trimbakeshwar Temple) हे देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक जागृत देवस्थान असून दक्षिण भारतातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक आहे. दर १२ वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela 2027), गंगा गोदावरी उत्सव, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा, श्रावण महिना प्रदक्षिणा यासारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वरला येत असतात. या पार्श्वभूमीवर त्रिंबक नगरपरिषद क्षेत्रात (Trimbak Municipal Council Area) पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामांसाठी त्रिंबक नगरपरिषदेला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा ठराव नगर परिषदेने २८ ऑगस्ट २०२४ रोजी मंजूर केला होता. या ठरावानुसार नाशिक विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता.
(हेही वाचा – लोकसभेत इमिग्रेशन विधेयक मंजूर; Amit Shah यांनी थेट घुसखोरांनाच दिला इशारा; म्हणाले…)
या प्रस्तवावर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घेत राज्य सरकारला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला ‘अ’ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. या शिफारशीला सरकारने गुरुवार २७ मार्चला मान्यता मिळाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community