श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात (Shri Trimbakeshwar Temple) मुसलमानांनी स्थानिक संदल निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी मंदिरात जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले आणि तेव्हा वाद निर्माण झाला. यानंतर या विषयावर राज्यभर चर्चा सुरू झाली. मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पत्र लिहिले. ज्यामध्ये मुसलमानांचा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होता, असा आरोप केला आहे.
या सर्व प्रकारची दाखल राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले. (Shri Trimbakeshwar Temple) त्यानुसार मंगळवार १६ मे रोजी कलम २९५ आणि ५११ नुसार चार जणांवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Monsoon : यंदा मान्सूनचे आगमन उशिरा; महाराष्ट्रात कधी येणार?)
मुख्य प्रवेशद्वाराचे हिंदू महासंघाकडून होणार शुद्धीकरण
या सर्व घटनेनंतर हिंदू महासंघाकडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण करून पूजा करण्यात येणार आहे. बुधवार १७ मे रोजी सकाळी साडे दहा वाजता ही पूजा करण्यात येणार आहे. (Shri Trimbakeshwar Temple)
हेही पहा –
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न
याविषयावर ब्राह्मण महासंघानेही पोलिसांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महादरवाजा येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील काही इतर धर्मिय व्यक्तींनी उत्तर महादरवाजा येथून समस्त हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून वरील कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जिल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, सदर घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे प्रकार भविष्यात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे ब्राह्मण महासंघाने पत्रात म्हटले. (Shri Trimbakeshwar Temple)
Join Our WhatsApp Community