महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता Trimbakeshwar Temple प्रशासनाचा मोठा निर्णय

48
महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता Trimbakeshwar Temple प्रशासनाचा मोठा निर्णय
महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता Trimbakeshwar Temple प्रशासनाचा मोठा निर्णय

त्र्यंबकेश्वर देवस्थान (Trimbakeshwar Temple) ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीच्या (Maha Shivratri) पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जात आहे. यंदाची महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात (Trimbakeshwar Mandir) दरवर्षी हजारो भाविक दर्शनसाठी येतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Trimbakeshwar Temple)

हेही वाचा-सोशल मीडियावरील अश्लील मजकुरांवर central government कठोर नियम लागू करणार ?

महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) दोन दिवस 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला पहाटे चार वाजल्यापासून ते 27 तारखेच्या रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर राहणार 24 तास सुरू आहे. तसेच, दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता सर्व प्रकारचे व्हिआयपी (VIP), प्रोटोकॉल (Protocol) व गर्भगृह दर्शन बंद (Sanctum Darshan closed) ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी (दि.26) रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Trimbakeshwar Temple)

हेही वाचा-Buldhana Crime : बुलढाण्यात अफूची शेती ; 12 कोटींचा अफू जप्त, मक्याच्या पिकात केली मधोमध लागवड

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला (Trimbakeshwar Temple) आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे त्तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

असे असेल नियोजन
सोमवारी (दि.24) मेहंदी तसेच मंगळवारी (दि. 25) हळदीचा समारंभ होणार आहे. सायंकाळी बासरी वादन कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि.26) दुपारी श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघेल. पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. पालखी दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत. ट्रस्टतर्फे बुधवारी (दि. 26) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे. (Trimbakeshwar Temple)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.