VIP Darshan: नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात पुढील सात दिवस व्हीआयपी दर्शन बंद

166
VIP Darshan: नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात पुढील सात दिवस व्हीआयपी दर्शन बंद
VIP Darshan: नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात पुढील सात दिवस व्हीआयपी दर्शन बंद

नाशिक येथे प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात, मंगळवार, २१ नोव्हेंबरपासून पुढील ७ दिवस व्हीयआपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

२५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान शासकीय सुट्या आहेत. २६ रोजी कार्तिक पौर्णिमा रथोत्सव आहे. या कालावधीत मंदिरात भाविकांची गर्दी होऊ शकते. यामुळे प्रशासनाचा वाढता ताण लक्षात घेता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी केंद्र , राज्य आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचारासंबंधी लेखी पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिआयपी दर्शन २१ ते २७ नोव्हेंबर या काळात बंद ठेवण्यात आले आहे.

(हेही वाचा – Cricket Bookie : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर ६० हजार कोटींचा सट्टा, क्रिकेट बुकी मालामाल  )

या कालावधीत भाविकांना पूर्व दरवाजा दर्शनबारी तसेच उत्तर दरवाजा २०० रुपये दर्शनबारी सुरू राहणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.