EPFO च्या खातेधारकांच्या निवृत्ती वेतनात तिप्पट वाढ!

89

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेदारांसाठी खुशखबर आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक पुढील महिन्यात होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या बैठकीत किमान पेन्शन नियमात तिप्पट वाढ करण्याबाबतची महत्तवपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत 1 हजार रुपयांची किमान निवृत्ती 3 हजार रुपये करण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार, कामगार सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती लवकरच या प्रकरणी आपला अहवाल सादर करणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 6.5 लाख निवृत्तीधारक आणि ईपीएफओच्या 5 कोटी ग्राहकांना होणार आहे. व्याजदरातील कपातीची नाराजी सरकार शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरुन काढण्याच्या विचारात आहे. ईपीएफओमधील निधी शेअर बाजारात वळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

फटका नोकरदारांना बसणार 

सीबीटी इक्विटीची मर्यादा 15 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. पण या ठिकाणी एक पेच निर्माण झाला आहे. कामगार संघटना इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या बाजूने नाहीत. शेअर बाजारातील अनिश्चिततेचे कारण पुढे करत संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. अर्थ मंत्रालयाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के होती. सरकारने व्याजदर घटवल्याच्या निर्णयाचा फटका देशभरातील 6.5 कोटी नोकरदारांना बसणार आहे.

( हेही वाचा: शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम! मनसेची टीका )

30 जूनपर्यंत पीएफचे व्याज होणार जमा

कर्मचारी भविष्य निर्वाहन निधी संघटनेने निर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. आता पीएफच्या व्याजाची रक्कम खात्यात कधी जमा होणार याची कर्मचा-यांना उत्सुकता आहे. साधारणत सरकार 30 जूनपर्यंत पीएफची रक्कम हस्तांतरीत करण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.