Tripura तील हॉटेलमध्ये बांगलादेशी पर्यटकांना राहण्यास बंदी; हॉटेल ऑनर्स असोसिएशनचा मोठा निर्णय

74
Tripura तील हॉटेलमध्ये बांगलादेशी पर्यटकांना राहण्यास बंदी; हॉटेल ऑनर्स असोसिएशनचा मोठा निर्णय
Tripura तील हॉटेलमध्ये बांगलादेशी पर्यटकांना राहण्यास बंदी; हॉटेल ऑनर्स असोसिएशनचा मोठा निर्णय

ऑल त्रिपुरा हॉटेल अॅण्ड रेस्टॉरेंट ऑनर्स असोसिएशनने (All Tripura Hotel And Restaurant Owners Association) दि. २ डिसेंबर रोजी बांगलादेशी नागरिकांना राज्यातील हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नाकारली आहे. बांगलादेशातील हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर आणि बांगलादेशातील हिंदू (Hindu) अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या निषेधात आगरतळा येथे झालेल्या निषेध आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला. (Tripura)

त्रिपुरातील हॉटेलमध्ये बांगलादेशी पर्यटकांना राहण्यास बंदी!

ऑल त्रिपुरा हॉटेल आणि रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनने जाहीर केले की बांगलादेशी नागरिकांना त्रिपुरातील हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व हॉटेल्सना त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांगलादेशी नागरिकांच्या प्रवेशास मनाई करणारे पोस्टर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी तपासणी वाढवण्यावरही संघटनेने भर दिला.(Tripura)

( हेही वाचा : बांगलादेशात इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांच्या वकीलावर हल्ला; प्रकृती चिंताजनक असल्याची राधारमण दास यांची माहिती

हॉटेल मालक संघटनेचे सचिव भास्कर चक्रवर्ती (Bhaskar Chakraborty) यांनी सांगितले की, हॉटेल मालक बांगलादेशी नागरिकांना सेवा नाकारण्याच्या त्यांच्या निर्णयात एकत्रितरित्या सहभागी झाले असून ते त्वरित अंमलबजावणी करतील, अशी आशा आहे. दरम्यान बांगलादेशात सत्ताबदल झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू (Hindu) अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांविरोधात आगरतळा येथे नुकत्याच झालेल्या निदर्शनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.(Tripura)

आगरतळा येथे निदर्शनादरम्यान ५० हून अधिक आंदोलक बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालय (AHC) च्या परिसरात पोहचले त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालय आणि भारतातील इतर ठिकाणी सुरक्षेत वाढ केलेली आहे. तसेच भारताने सांगितले की बांगलादेशातील अंतरिम सरकारने सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्याचबरोबर भारताने हिंदूंवरील (Hindu)हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (Tripura)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.