ST Corporation : अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाची त्रिसुत्री

54
ST Corporation : अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाची त्रिसुत्री

दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या ‍निर्दोष बसेस उपलब्ध करुन देणे या त्रिसुत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील, असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले. (ST Corporation)

(हेही वाचा – Fake Bomb Call: चाळीसगाव रेल्वे स्थानकावर खोट्या बॉम्बच्या धमकीचा संदेश; आरोपीला दोन तासांत अटक)

भंडारा व नाशिक येथे झालेल्या एसटीच्या अपघाताबरोबरच नुकत्याच बेस्ट चालकाकडून घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ ‍अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने चालक प्रशिक्षण, चालकांची निवड चाचणी, चालकाचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करुन देण्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. सध्या एसटी महामंडळाच्या चालकांना अपघात होऊ नये यासाठी दर ६ महिन्याला उजळणी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये चालकांच्या मानसिक आरोग्याबरोबरच त्यांचे बस चालवण्याचे कौश्‍ल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालन चाचणी घेऊन त्यांना पुनश्च सेवेमध्ये दाखल केले जाते. तसेच कर्तव्यावर असताना संबंधित चालकाने नशापान न करणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. ही पद्धत एसटीकडे कार्यरत असलेल्या खाजगी चालकांना देखील वापरण्याच्या सुचना अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिल्या. (ST Corporation)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis राज्य प्रशासनात मोठ्या फेरबदलाच्या तयारीत)

वेळेत बसेसचा पुरवठा न करण्याऱ्या संस्थाना कारणे दाखवा नोटिसी पाठवा. सध्या एसटी महामंडळाकडे १४००० बसेस असून, उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपुऱ्या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस अत्यंत जुन्या झाल्या आहेत. तसेच काही बसेस कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. ही वसुस्थिती लक्षात घेता निविदा पात्र संस्थांनी नवीन बसेसचा वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक होते. तथापि, त्या संस्था बसेस पुरविण्याबद्दल सक्षम का नाहीत? याची शहानिशा करुन त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवून द्यावी असे निर्देश अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिले. भाडेवाढीचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर करणार. कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुट्ट्या भागांची वाढती किंमत विचारात घेऊन सन २०२१ पासून प्रलंबित असलेली एसटीची ‍तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाईल अशी माहिती अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (ST Corporation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.