मुंबईकरांनो रविवारी सकाळी किंग्ज सर्कलच्या दिशेने जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सायन येथील किंग्ज सर्कल रेल्वे पुलाच्या खाली ट्रकचा अपघात झाला असून याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीट करत यांसदर्भातील माहिती दिली आहे.
( हेही वाचा : Traffic Fines : चप्पल घालून कार चालवल्यास दंड आकारला जातो का? जाणून घ्या काय आहेत नियम)
किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहिनीवर ट्रक अडकल्याने वाहतूक मंदावली आहे.
due to a truck stuck Southbound under King’s Circle railway bridge. Traffic is slow#MTPTrafficUpdates— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) November 6, 2022
रेल्वे पुलाचे मोठे नुकसान
ट्रक रेल्वे पुलाला धडकल्याने या अपघातात रेल्वे पुलाचा खांब तुटून खाली पडल्याने वाहतूक मंदावली आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आरपीएफ पोलिसांसह वाहतूक पोलिसही दाखल झाले आहेत. पुलाखाली अडकलेला अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेण्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सकाळच्या दरम्यान सायन गांधी मार्केट येथील पुलाच्या एकाबाजूने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या अपघातामध्ये रेल्वे पुलाचे मोठे नुकसान झाले आहे.
Join Our WhatsApp Community