केंद्र सरकारने हिट अॅण्ड रनसंदर्भात पारित केलेल्या नव्या कायद्याविरोधात वाहतूक संघटनांच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. (Truck Driver Strike School Bus Operator) मंगळवार, २ जानेवारी रोजी या संपाचा दुसरा दिवस आहे. याचा परिणाम शाळांच्या बसेसवरही होत आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये स्कूल बस मालकांच्या संघटनांनी स्कूल बस (School Bus) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – RBI on Unclaimed Deposits : बँकांमधील बेवारस ठेवींचा आढावा घेण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या बँकांना सूचना)
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्कूल बसच्या संघटनांना विशेष आवाहन केले आहे. स्कूल बसच्या संघटनांनी या संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे. ‘संपात सहभागी झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी सर्वांना घ्यायला हवी’, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
कायदा सुव्यवस्था बिघडेल, असे कोणीही वागू नये. बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही केसरकर या संपाविषयी म्हणाले.
(हेही वाचा – PM Narendra Modi : कोणत्याही देशाला दिशा देण्यात विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावतात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन)
इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
हिट अॅण्ड रनसंदर्भातील (Hit and run) कायद्याविरोधात वाहतूक संघटनेने सुरु केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संपामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने बसमधील डिझेलची बचत करण्याच्या उद्देशाने बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बसमालक (School Bus Operator) संघटनांनी घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community