Truck Driver Strike: मालवाहतूकदारांचा संप मागे, इंधन पुरवठा सुरळीत होण्यास विलंब

मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे.

268
Truck Driver Strike: मालवाहतूकदारांचा संप मागे, इंधन पुरवठा सुरळीत होण्यास विलंब
Truck Driver Strike: मालवाहतूकदारांचा संप मागे, इंधन पुरवठा सुरळीत होण्यास विलंब

ट्रक मालकांच्या संघटनेकडून (Truck Driver Strike) ट्रक आणि टँकरचालकांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता ट्रक आणि गाड्या चालवा, असं आवाहन मालक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहसचिवांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘हिट अँड रन’ प्रकरणातल्या कायद्यात नव्या तरतुदी तुर्तास लागू होणार नाहीत, असं आश्वासन केंद्रीय गृह खात्याकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे ट्रक मालकांच्या संघटनेकडून ट्रक आणि ट्रकचालकांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता ट्रक आणि तुमच्या गाड्या चालवा, असं आवाहन मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Weather Forecast: गेल्या वर्षीच्या अतिउष्णतेमुळे हिवाळी चक्र बिघडले; जानेवारीमध्ये थंडी कमी, पावसाची शक्यता आणि फेब्रुवारीत उन्हाची तीव्रता )

मुंबईत बुधवारी पहाटेपासूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली आहे. ट्रान्सपोर्ट युनियनने जरी संप मागे घेतला असला तरी मुंबईत काही ठिकाणी मंगळवारी दिवसभर पेट्रोलपंपावर रांगा लागलेल्या दिसल्या. काही ठिकाणी साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद आहेत, तर काही ठिकाणी पेट्रोलपंपावर साठा आहे, पण बुधवारी पहाटेपासूनच मुंबईकरांनी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

स्कूल बसेसना जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील
मालवाहतूकदारांनी संप जरी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवसांच्या संपामुळे राज्यात अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे. संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशी भूमिका स्कूल बस असोसिशनने घेतली आहे. हिट अँड रन कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यात सहभागी झालेलो नाहीत. स्कूल बसेसना जोपर्यंत डिझेल मिळेल तोपर्यंत बस रस्त्यावर धावतील आणि सेवा देतील, अशी माहिती महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे.

नागपुरात पेट्रोलपंपातील पेट्रोल पूर्णत: संपले 
नागपुरात बुधवारी (३ डिसेंबर) रात्री उशिरापर्यंत ७५ टक्के पेट्रोलपंपातील पेट्रोल पूर्णत: संपले आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी माहिती दिली, तर दुसरीकडे प्रशासनाकडून पोलीस सुरक्षेत पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.