केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या अधिकाऱ्यांची मंगळवार, २ जानेवारी रोजी बैठक घेतली. या बैठकीनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदन म्हणाले की, नवीन कायद्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. भारतीय न्यायिक संहितेचे कलम 106/2 लागू करण्यापूर्वी आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या लोकांशी बोलू, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे गृहसचिव भल्ला यांनी सांगितले, असल्याचे म्हटले.
त्यानुसार ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदन यांनी देशभरातील ट्रक चालकांना ‘तुम्हाला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये अशी आमची इच्छा आहे. आमची पुढची बैठक होईपर्यंत 10 वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, असे सांगितले. दरम्यान मागील दोन दिवसांपासून ट्रक चालकांचा (Truck Strike) संप सुरु होता. त्यात इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकचा समावेश होता. त्यामुळे पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी जमली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांनी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन केले. तसेच भाजीपालाची वाहतूक झाली नाही, त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले.
Join Our WhatsApp Community